'मिस्टर गे इंडिया'चा संघर्षमय प्रवास, कोल्हापूरचा पुस्तक विक्रेता आता जग जिंकणार

Last Updated:

लिंगभेदाचं जीवन जगत आणि परिस्थितीशी संघर्ष करत कोल्हापूरकर विशालनं मोठी कामगिरी केलीय. आता तो जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

+
मिस्टर गे इंडिया

'मिस्टर गे इंडिया'चा संघर्षमय प्रवास, कोल्हापूरचा पुस्तक विक्रेता आता जग जिंकणार

पुणे, 7 ऑक्टोबर: माणूस स्वतःचे भविष्य स्वत:च घडवतो. मात्र, समाजासमोर हे सिद्ध करण्याची हिंमत फार कमी लोकांमध्ये असते, कारण यासाठी त्यांना अनेक सामाजिक अडथळे आणि आव्हानांना सामोरं जावं लागतं. असेच अनेक अडचणींचा सामना करत कोल्हापूरचा विशाल पिंजानी हा यंदाचा 'मिस्टर गे इंडिया 2023' ठरला आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये होणार्‍या 'मिस्टर गे वर्ल्ड 2023' स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पुस्तक विक्रेता ते मिस्टर गे इंडिया
विशाल हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला असून व्यवसायाने ग्रंथ प्रकाशक आणि पुस्तक विक्रेता आहे. त्याने मिस्ट एलजीबीटीक्यू फाऊंडेशन आणि क्वीरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या 'मिस्टर गे इंडिया 2023' स्पर्धेत सहभाग घेतला होता. मला माझ्या कुटुंबाकडून विशेषत माझी बहिण आणि छोटी पुतणी यांच्याकडून यासाठी खूप प्रोत्साहन मिळालं, असं विशाल सांगतो.
advertisement
समाजात अवमानकारक वागणूक
समाजात लैंगिक भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. लैंगिक अल्पसंख्याक म्हणजेच समलिंगी अथवा तृतीयपंथी लोकांकडे तुच्छतेने पाहिलं जातं. अनेकदा कुटुंबीय, आप्तस्वकीय, मित्रमंडळी पाठिंबा देत नाहीत. भावनिक आधाराचा अभाव, अवमानकारक वागणूक, आमच्यावरील अत्याचार, बलात्कार, खून अशा अनेक समस्या आहेत. आम्हाला सन्मान मिळावा, द्वेषभावना वाट्याला येऊ नये, यासाठी काम करत आहे. आता दक्षिण आफ्रिकेतील 'मिस्टर गे वर्ल्ड' साठी तयारी करत आहे. असं विशाल सांगतो.
advertisement
कशी झाली स्पर्धा?
या स्पर्धेत विविध राज्यातून 20 स्पर्धक सहभागी झाले होते. विविध फेर्‍या यशस्वी होत विशाल आणि केरळचा अभिषेक अंतिम फेरीत दाखल झाले. दोघांनीही उत्तम सादरीकरण करत आपली सामाजिक जाणीव आणि समज दाखवली. एकमेकांना चुरस दिली. यामध्ये विशालने बाजी मारत मिस्टर गे इंडिया 2023 चा किताब जिंकला. यासह विशालला 'मिस्टर गे महाराष्ट्र' व अभिषेक याला 'मिस्टर गे केरळा' किताब देऊन सन्मानित करण्यात आले.
advertisement
स्पर्धकांनी जिंकली मनं
एलजीबीटीक्यू समुदायाला सक्षम करण्यासाठी, सन्मानाने जगण्याची संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. हे पॅजेंट सकारात्मक बदल घडवून जगण्यातील अडथळे दूर करेल. या तुच्छतेने पाहिल्या जाणार्‍या समुदायाला मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. देशाच्या विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी आपली पार्श्वभूमी, अनुभव, आजवरचा प्रवास, प्रेरणा, अनेकांकडून मिळालेली मौल्यवान साथ, समुदायाला सन्मान देण्यासाठी जागृती करण्याचा विचार मांडत परीक्षक आणि उपस्थितांची मने जिंकली, असं आयोजकांनी म्हटलंय.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मिस्टर गे इंडिया'चा संघर्षमय प्रवास, कोल्हापूरचा पुस्तक विक्रेता आता जग जिंकणार
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement