Ashadhi Ekadashi Wishes : बोला रामकृष्ण हरी, चला जाऊ पंढरी! आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा शुभेच्छा संदेश
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) हा सर्व वारकऱ्यांसाठी एक खास दिवस असतो. या दिवशी आवर्जून एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या जतात. या दिवशी अनेक दिवस विठूनामाचा गजर करत पायी चालत वारकरी पंढरीला पोहोचतात.
आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) हा सर्व वारकऱ्यांसाठी एक खास दिवस असतो. अनेक दिवस विठूनामाचा गजर करत पायी चालत वारकरी पंढरीला पोहोचतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेतात. यंदा बुधवार 17 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. तेव्हा यानिमित्त तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश (Ashadhi Ekadashi Chya Hardik Shubhechha) पाठवू शकता.
"सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!"
“चैतन्याचा गाभा… विटेवर उभा
पालख्यांचा सोहळा नाही.. वारकऱ्यांचा मेळा नाही
मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान..
पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा
रखूमाईवर उभा विटेवर..
कर कटेवर ठेऊनिया भगवंता,
तव तेज ह्या तिमिरात दे आता”
advertisement
आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा…!
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो आनंदाचा पूर,
चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर,
“जगण्याचं बळ देणारी
विठ्ठला तुझी वारी
यंदा भेट नाही पांडुरंगा”
चंद्र भागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी,
advertisement
विठ्ठल विठ्ठल जय हरी..!
तुझा रे आधार मला, तूच रे पाठीराखा,
तूच रे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा,
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो,
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2024 3:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ashadhi Ekadashi Wishes : बोला रामकृष्ण हरी, चला जाऊ पंढरी! आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा शुभेच्छा संदेश


