Dry Ice: हॉटेलमध्ये गेल्यावर चुकूनही खाऊ नका ही पांढरी गोष्ट, आरोग्यासाठी ठरते स्लो पॉईजन
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
ड्राय आइस तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
सध्या अनेक लोक सरार्स हॉटेलमध्ये जाऊन खाण पसंत करतात. अनेक हॉटेल चालक आपल्या ग्राहकांना प्रलोभन देण्यासाठी विविध प्रकारच्या टेक्निक वापरात. ज्यात ड्राय आइसचा देखील समावेश असतो. ड्राय आइस हा ड्रिंक्स किंवा पदार्थ सर्व्ह करताना पांढरा धूर येण्यासाठी वापरला जातो. हा पांढरा धूर लोकांचे लक्ष वेधून घेतो. परंतु हा ड्राय आइस तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.
काही दिवसांपूर्वीच गुरुग्रामच्या एका रेस्टोरेंटमधील घटना समोर आली होती. येथे माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आइस सर्व्ह करण्यात आली होती. ज्याला खाल्ल्याने 5 जणांच्या तोंडातून रक्त आणि उलट्या होऊ लागल्या. तेव्हा ड्राय आइस शरीरासाठी किती घातक ठरू शकते याविषयी राजकीय मेडिकल कॉलेज कन्नौजचे इंटरनल मेडिसिन हेड प्रोफेसर डॉ. रामबाबू यांनी मार्गदर्शन केले आहे.
advertisement
काय आहे ड्राय आइस?
तज्ज्ञांच्या मते ड्राय आइस हा एक प्रकारे सुखलेला बर्फ असतो ज्याचे तापमान -80 डिग्री असते. हा ड्राय आइस कार्बन डाइऑक्साइड पासून बनलेला असतो. ड्राय आइस हा सामान्य बर्फाच्या तुलनेत 40 टक्क्यांपेक्षा जास्त थंड असतो. साधारण बर्फ तोंडात ठेवल्यावर वितळून त्याचे पाणी होते. परंतु ड्राय आइस वितळल्यावर कार्बन डाइऑक्साइड गॅसमध्ये रूपांतरित होते. ड्राय आइसचा उपयोग साधारणपणे किराणा सामान आणि वैद्यकीय वस्तू ठेवण्यासाठी वापरला जातो. तसेच ड्राय आइसचा वापर फोटोशूटमध्ये देखील केला जातो.
advertisement
ड्राय आइस कशी बनवली जाते?
साधारण बर्फाच्या तुलनेत ड्राय आइस बनवण्याची पद्धत वेगळी असते. कार्बन डाइऑक्साइडला जेव्हा जवळपास -78.5°C (-109.3°F) तापमानावर सॉलिड केले जाते तेव्हा ड्राय आइस बनवता येते. हा एक प्रकारचा कंप्रेस्ड आणि कूलिंग गॅस असतो, ज्याला लिक्विड फेजमध्ये पोहोचवण्यासाठी सॉलिड स्टेजमध्ये पोहोचवले जाते. जेव्हा ड्राय आइस गरम किंवा साधारण तापमानाच्या संपर्कात येते तेव्हा सॉलिडच रूपांतर थेट गॅसमध्ये होत आणि त्यातून पांढरा धूर बाहेर पडतो.
advertisement
ड्राय आइस शरीरासाठी का असतो घातक?
डॉक्टर रामबाबू यांच्या सांगण्यानुसार, ड्राय आइस कार्बन डाइऑक्साइड पासून बनवलेली असते. याचा वापर सामान्यतः कूलिंग एजंट म्हणून केला जातो. जर हा ड्राय आइस गरम किंवा साधारण तापमानाच्या संपर्कात आला कि त्याचे गॅसमध्ये रूपांतर होते ज्याच्या संपर्कात अधिककाळ राहिल्याने गुदमरणे, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या जाणवू शकतात. जास्त काळ कोरडा बर्फ वापरल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 07, 2024 9:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Ice: हॉटेलमध्ये गेल्यावर चुकूनही खाऊ नका ही पांढरी गोष्ट, आरोग्यासाठी ठरते स्लो पॉईजन









