सुपरफूड बाजरी! हिवाळ्यात नक्की करा आहारात समावेश, एक-दोन नाही असंख्य फायदे

Last Updated:

बाजरीमध्ये भरपूर फायबर, कमी कॅलरीज, आणि आवश्यक पोषक तत्वे असल्याने तिला सुपरफूड म्हणून ओळखले जाते.

+
बाजरीची

बाजरीची भाकरी 

नारायण काळे -  प्रतिनिधी
जालना : हिवाळ्याचा ऋतू म्हणजे आरोग्याला पोषक आणि पचनासाठी अनुकूल असलेला काळ. याच ऋतूमध्ये शरीराच्या गरजेनुसार अधिक पोषणमूल्ये देणाऱ्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात केला जातो. बाजरीची भाकरी हा असाच एक आरोग्यदायी आणि पचनसुलभ पदार्थ आहे. बाजरीमध्ये भरपूर फायबर, कमी कॅलरीज, आणि आवश्यक पोषक तत्वे असल्याने तिला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीची मागणी ऊसतोड मजुरांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढते.
advertisement
बाजरीचे पोषणमूल्य आणि फायदे
बाजरीमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हाडे मजबूत होतात आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. बाजरीच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बाजरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा लो ग्लायसेमिक इंडेक्स, जो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. आहार तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांच्यानुसार, टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी बाजरीचा समावेश आहारात केल्याने मोठा फायदा होतो.
advertisement
पचनसुलभ आणि वजन नियंत्रणात ठेवणारी बाजरी
बाजरीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ती पचनास हलकी असते. बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठता, पोटफुगी यांसारख्या त्रासांवरही बाजरीचा सकारात्मक परिणाम होतो.
advertisement
बाजरीची मागणी आणि बाजारभाव
हिवाळ्यात बाजरीच्या भाकरीला विशेष मागणी असते. ऊसतोड मजुरांसाठी पचनसुलभ आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असल्याने बाजरी हिवाळ्यात आहाराचा अविभाज्य भाग बनते. याच काळात बाजरीच्या दरामध्येही सुधारणा होते. सध्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीला प्रति क्विंटल 3000 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
बाजरीच्या या फायद्यांमुळे हिवाळ्यात तिचा समावेश आहारात नक्कीच करायला हवा. ती आरोग्यासाठी लाभदायक असूनही चविष्ट देखील आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सुपरफूड बाजरी! हिवाळ्यात नक्की करा आहारात समावेश, एक-दोन नाही असंख्य फायदे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement