Matar Recipe Video : मटार पनीर-मटार फ्लॉवर, काय तेच तेच खाणार; ट्राय करा मटारची नवी रेसिपी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Matar Kheema Recipe Video : मटारचे आजवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपेक्षा थोडा असा हटका असा हा पदार्थ. ज्याची रेसिपी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
मटार म्हटलं की मटार पनीर, मटार फ्लॉवर, मटार कोबी, मटार पुलाव, मटार पराठा, मटार टिक्की हे ठरलेले पदार्थ... पण मटारचे तेच तेच पदार्थ खाऊन आता तुम्हालाही कंटाळा आला आहे. आता यात आणखी एक नवीन रेसिपी अॅड करा. मटारचे आजवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांपेक्षा थोडा असा हटका असा हा पदार्थ. ज्याची रेसिपी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
पण मटारचं सीझन आहे. पुन्हा लवकर काही मटार खायला मिळणार नाहीत. तसंच मटार स्वस्तही झाले आहेत म्हणून लोक भरपूर मटार खरेदी करत आहेत. पण आता इतक्या मटारचं काय करायचं. रोज तेच तेच पदार्थ नको. तर मटारची ही रेसिपी बनवून पाहा.
advertisement
गॅसवर कढई गरम करा, त्यात तेल टाका. जिरं फोडणीला टाका. आता यात कांदा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो टाकून कांदा लाल होईपर्यंत आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्या. आता यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला, मीठ टाकून परतून घ्या.
आता मटार मिक्सरमध्ये असेच वाटून घ्या, ते कढईत टाका आणि त्याच्यासोबतच मेथीची पाने टाकून चांगले मिक्स करून घ्या. थोडी पाणी आणि अख्खे मटार टाकून झाकण मारून शिजवून घ्या, मटार शिजले की त्यात दही, काजूची पेस्ट, धनेपूड टाकून नीट मिक्स करा. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
advertisement
अरे हो! या रेसिपीचं नाव सांगायचं राहिलं नाही का, मटारचा हा पदार्थ आहे मटार खिमा. @archees_kitchen11 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा मटार खिमा पाहताना कसा वाटला, तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पाहा आणि कशी झाली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
advertisement
तुम्ही मटारपासून असा आणखी कोणता वेगळा पदार्थ बनवत असाल तर त्याची रेसिपीही आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका. ती रेसिपी आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
Dec 28, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Matar Recipe Video : मटार पनीर-मटार फ्लॉवर, काय तेच तेच खाणार; ट्राय करा मटारची नवी रेसिपी










