ते दृश्य पाहिलं अन् पुणेकर तरुणानं बनवला जगातला सर्वात लहान पिझ्झा

Last Updated:

World Record: पुणेकर तरुणानं सर्वात लहान 8 लाख बटन पिझ्झा तयार करण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे याची किंमत ही सर्वांना थक्क करणारी आहे.  

+
ते

ते दृश्य पाहिलं अन् पुणेकर तरुणानं बनवला जगातला सर्वात लहान पिझ्झा

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : एखादी घटना किंवा प्रसंग माणसाच्या आयुष्यालाच कलाटणी देणारा ठरतो. पुण्यातील सेलिब्रिटी शेफ सर्वेश जाधव यांच्याबाबत हे खरं ठरलंय. रस्त्यावरून जाताना त्यांनी एक दृश्य पाहिलं आणि एक जागतिक विक्रमच केला. त्यांनी जगातील सर्वात लहान 8 लाख बटन पिझ्झा तयार केला असून त्याची नोंद लिम्का बुक ऑफर वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीये. विशेष म्हणजे या बटन पिझ्झाची किंमत फक्त 1 रुपया इतकी आहे.
advertisement
पुण्यातील कोथरूड भागात रिका नावाने सर्वेश जाधव यांचा कॅफे आहे. याच कॅफेमध्ये त्यांनी जगातील सर्वात छोटा 1 इंचाचा पिझ्झा बनवला आहे. आतापर्यंत त्यांनी 8 लाख बटन पिझ्झा बनवले आहेत. 2017 पासून आजपर्यंत त्यांच्या या पिझ्झाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांची बटन पिझ्झाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाल्याचं ते सांगतात.
advertisement
कशी सुचली कल्पना?
भांडारकर रोड वरून घरी जात असताना गुडलक चौक येथे दोन लहान गरीब मुलं दिलेलं अन्न खात होते. त्यामध्ये बर्गर आणि आर्धा पिझ्झाचा स्लाईस होता. हे दृश्य पाहिलं आणि त्यांना विचारलं की परत पिझ्झा कधी खाणार आहात? पण ते बोलले की कोणी दिला तर खाणार. ती लाईन मला हिट झाली. मग विचार केला की या लोकांना परत खायचं असेल तर त्यांना ते परवडलं पाहिजे. माणसाला कमीत कमी 1 रुपया नक्कीच परवडू शकतो. म्हणून बटन पिझ्झा बनवला आणि त्याची किंमत ही फक्त एक रुपया ठेवली, असं सर्वेश सांगतात.
advertisement
गरीब मुलांसाठी हा बटन पिझ्झा तयार केला. आतापर्यंत 8 लाखांवर बटन पिझ्झा तयार झाले आहेत. हा छोटासा पिझ्झा तयार करणे तसं अवघड आहे. पण तो विकून मिळणारा आनंद मोठा आहे. यामुळे केवळ गरीब मुलांची उपासमार मिटली नाही, तर गरीब मुलांमध्ये स्वाभिमानाने खाण्याची प्रेरणा दिली, अशा भावना सर्वेश जाधव यांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/Food/
ते दृश्य पाहिलं अन् पुणेकर तरुणानं बनवला जगातला सर्वात लहान पिझ्झा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement