दानव-देशमुखांना समसमान मतं, उपमहापौरपदाचा निर्णय ईश्वरचिठ्ठीने, चंद्रपुरात फुल्ल राजकीय ड्रामा!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Chandrapur Mahanagarpalika Deputy Mayor Election: चंद्रपूर महापालिकेत सध्या मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळत आहे. इथं भाजपनं काँग्रेसच्या घशातून सत्ता खेचून आणली आहे.
Chandrapur Mahanagarpalika Deputy Mayor Election: चंद्रपूर महापालिकेत सध्या मोठा राजकीय ड्रामा बघायला मिळत आहे. इथं भाजपनं काँग्रेसच्या घशातून सत्ता खेचून आणली आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष ठरूनही भाजपनं काँग्रेसला सत्तेबाहेर बसवलं आहे. भाजपनं इथं ठाकरे गट, शिंदे गट आणि अपक्ष नगरसेवकांच्या साथीनं सत्ता स्थापन केली आहे. इथं अवघ्या एका मताने भाजपच्या संगीता खांडेकर महापौर बनल्या आहेत.
दुसरीकडे, चंद्रपुरात उपमहापौर पदावरून देखील राजकीय ड्रामा बघायला मिळाला. इथं उपमहापौर पदासाठी काँग्रेस समर्थित उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित ठाकरे गटाचे उमदेवरा प्रशांत दानव यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत दोघांनाही समसमान 32-32 मतं मिळाली. त्यामुळे उपमहापौर कोण बनणार? असा पेच निर्माण झाला होता. मात्र ईश्वर चिठ्ठीने देखील भाजपची साथ दिली. इथं उपमहापौर म्हणून प्रशांत दानव यांची निवड झाली आहे.
advertisement
चंद्रपुरात महापौरपदावरून कसा गेम फिरला?
६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या होत्या. इथं काँग्रेस आणि शेकापनं एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यामुळे शेकापच्या ३ नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा होता. अशात काँग्रेसला स्वत:चा महापौर करण्यासाठी अवघ्या ४ नगरसेवकांची गरज होती. अशात इथं ठाकरे गटाचे सहा नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे ठाकरे गटाला सोबत घेतलं तर बहुमताचा आकडा सहज क्रॉस होत होता. पण ठाकरे गट आणि वंचितने स्वतंत्र गट स्थापन करत महापौर पदाची मागणी केली. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी थेट भूमिका ठाकरे गटाने घेतली.
advertisement
तसेच काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत कलहामुळे काँग्रेसचे २७ नगरसेवक शेवटपर्यंत एकत्र येऊ शकले नाहीत. काँग्रेसमधील याच अंतर्गत वादाचा फायदा भाजपनं घेतला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सत्तेत वाटा देत युती जुळवून आणली. ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देताच बहुमताचा आकडा भाजपच्या बाजुने झुकला.
advertisement
ठाकरेंनी पाठिंबा दिला असला तरी भाजप अद्याप बहुमतापासून दूर होतं. अशात एमआयएम आणि वंचितने भाजपला पडद्याआडून मदत केली. दोन्ही पक्षाचे मिळून तीन नगरसेवक महापौरपदाच्या निवडीला गैरहजर राहिले. साहजिकच यामुळे बहुमताचा आकडा ३४ वरुन ३२ वर आला. परिणामी भाजपच्या संगीता खांडेकर एका मताने विजयी झाल्या. त्यांना ३२ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या उमेदवाराला ३१ मतं मिळाली.
advertisement
चंद्रपूर महानगरपालिका निकाल २०२६ (एकूण जागा: ६६)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)२७
भारतीय जनता पक्ष (BJP)२३
शिवसेना (UBT)०६
शेतकरी कामगार पक्ष (PWP)०३
वंचित बहुजन आघाडी (VBA)०२
अपक्ष (Independents)०२
(MIM, BSP, SHS-शिंदे)प्रत्येकी १
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 1:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दानव-देशमुखांना समसमान मतं, उपमहापौरपदाचा निर्णय ईश्वरचिठ्ठीने, चंद्रपुरात फुल्ल राजकीय ड्रामा!









