कडाक्याच्या थंडीचा वृद्धांना धोका, हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? Video

Last Updated:

हिवाळ्यातील कडक थंडीत वृद्धांना धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे त्यांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.

+
कडाक्याच्या

कडाक्याच्या थंडीचा वृद्धांना धोका, हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? Video

वर्धा, 22 नोव्हेंबर: थंडीचे दिवस हे विविध कारणांनी अनेकांना आवडत असले तरी या काळात अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. विशेषतः वृद्धांना थंडीचा त्रास होतो आणि हृदयरोग किंवा पॅरालिसिस सारखा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वृद्धांनी थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी?आहारात कोणत्या वस्तूंचा समावेश करावा याबद्दल आपण वर्धा येथील डॉक्टर जयंत गांडोळे यांच्याकडून जाणून घेऊया.
बाहेर पडताना गरम कपडे
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कडाक्याची थंडी असते. त्यामुळे वृद्धांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त गरम कपडे, स्वेटर, पाय आणि हातमोजे, टोपीचा वापर करावा. अनेकांना मॉर्निंग वॉकची सवय असते. मात्र थंडीच्या दिवसात पहाटे बाहेर पडणे शक्यतो टाळावे किंवा गेलातच तर गरम कपडे घालणं गरजेचं आहे, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
आहारात गरम पदार्थांचे सेवन
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात गरम पदार्थांचे सेवन करा. जेणेकरून शरीरातील आंतरिक तापमान हे संतुलित राहण्यास मदत होईल. तिळाचे सेवन, गुळाचे सेवन, सुकामेवा आणि सोबतच बाजरीची भाकर अशा प्रकारच्या गरम पदार्थांचे सेवन केल्यास शरीरातील तापमान योग्य राहील. तसेच रक्त गोठण्याच्या समस्ये पासूनही बचाव होऊ शकतो. सोबतच चांगले आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणंही महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर गांडोळे यांनी सांगितलं.
advertisement
वेळेवर औषधी आणि त्वचेची काळजी
हिवाळ्यामध्ये जेवण केल्यावर किंवा जेवणाच्या आधीच्या आपल्या ज्या नेहमीच्या औषधी असतील तर त्याही वेळेत घेणं गरजेचं आहे. सोबतच त्वचेची काळजी ही महत्त्वाची ठरते. कारण वृद्धांची त्वचा आधीच कोरडी आणि सुरकुत्या पडलेली असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी जास्त घ्यावी लागेल. त्वचेवर व्यासलीन किंवा चांगलं मॉइश्चरायझर लावावं. त्या व्यतिरिक्त मोहरीचं तेल तुम्ही त्वचेवर लावू शकता. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही. भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
advertisement
या रुग्णांनी धुक्यात जाणे टाळा
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा धुके पडलेले दिसते. तर अशा वातावरणात श्वसनाचे आजार किंवा अस्थमाच्या रुग्णांनी बाहेर पडणे टाळावे. विशेषतः पहाटेच्या दरम्यान असलेल्या थंडीत अस्थमाचे रुग्णांनी बाहेर जाणे टाळलेले बरे. बाहेर गेल्यास हातमोजे, पाय मोजे, स्वेटर, कान टोपी आणि बूट घालून बाहेर जावे. जेणेकरून श्वसन प्रक्रियेला काही त्रास होणार नाही. सोबतच सर्व व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकले तर त्वचेची स्निग्धता टिकून राहील, असेही डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
रात्री आणि पहाटेच्या दरम्यान तापमानात चांगलीच घट झालेली दिसून येते. ही थंडी वृद्धांना अनेकदा सहन होत नाही. त्यामुळे हृदयविकार किंवा पॅरलिसीस म्हणजेच लकवा यासारखे परिणाम जास्त दिसून येतात. यापासून वृद्धांनी स्वतःला वाचवून योग्य संतुलित आहार, योग्य वेळी औषधी, गरम कपड्यांचा वापर, भरपूर पाणी पिणे तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे ठरते.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
कडाक्याच्या थंडीचा वृद्धांना धोका, हिवाळ्यात कशी घ्यावी काळजी? Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement