लग्नासाठी दोघांचे किती गुण जुळणे महत्त्वाचे असतात? ज्योतिषांकडून वेळीच जाणून घ्या, अन्यथा बिघडून जाईल सर्व...
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
गुण जुळणे हे विवाहासाठी महत्त्वाचे आहे. कुंडलीतील 18 गुण जुळणे आवश्यक आहे. दोष जसे की मंगळ दोष, नाडी दोष यांचा विवाहावर मोठा परिणाम होतो. गुण जुळल्यामुळे वैवाहिक जीवन सुरळीत होते आणि भविष्यातील अडचणी टाळता येतात.
लग्न ठरवण्यापूर्वी वधू-वरांची कुंडली जुळवणे महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार वधू आणि वर यांची कुंडली जुळवल्याने भविष्यातील दुःख, अडथळे आणि संकटांपासून वाचता येते. कुंडलीत गुण, मंगळ दोष, नाडी दोष, गण दोष यांसारख्या बाबी तपासल्या जातात.
पंडित श्रीधर शास्त्री यांच्या मते, लग्नासाठी वधू-वरांच्या कुंडलीत किमान 18 गुण जुळणे गरजेचे आहे. जर 18 गुणांपेक्षा कमी गुण जुळले, तर लग्नानंतर वैवाहिक जीवनात त्रास आणि दुःख उद्भवण्याची शक्यता वाढते. त्यामुळे योग्य गुण जुळल्याशिवाय विवाह टाळावा असे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Numerology: प्रचंड हुशार असतात या जन्मतारखांच्या व्यक्ती, परीक्षेत कोणीच पकडू शकत नाही हात!
advertisement
मंगळ दोष हे गुण जुळणं मुख्य भाग आहे. वधू किंवा वर यांच्यापैकी कोणाच्या कुंडलीत मंगळ दोष आहे का, हे सर्वप्रथम तपासले जाते. दोष असल्यास, योग्य उपाय योजना करून त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, अन्यथा विवाह टिकण्याच्या शक्यता कमी असते.
गुण जुळल्याने दोघांमधील स्वभाव जुळतो, वैवाहिक जीवनात समन्वय राहतो आणि संकटे कमी होतात. परंतु गुण कमी जुळल्यास भविष्यात मतभेद, संघर्ष किंवा लग्न तुटण्याचा धोका असतो.
advertisement
हे ही वाचा : Astrology: खूपच वाट पाहिली! उच्च राशीत शुक्र आल्याबरोबर सगळं पालटणार, सुवर्णकाळाची सुरुवात
फक्त गुण जुळणेच नाही, तर नाडी दोष, गण दोष यांसारख्या दोषांचेही निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. यामुळे विवाहाचे भविष्य अधिक सुरक्षित होते. कुंडली जुळवणे हा लग्न ठरवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो कोणत्याही प्रकारे टाळू नये.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 20, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नासाठी दोघांचे किती गुण जुळणे महत्त्वाचे असतात? ज्योतिषांकडून वेळीच जाणून घ्या, अन्यथा बिघडून जाईल सर्व...







