Olive Oil versus Mustard Oil: ऑलिव्ह ऑईल की मोहरीचं तेल, हृदयासाठी कोणतं तेल फायदेशीर?
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Olive Oil or Mustered Which Oil is best for Heart: बाजारात सध्या अनेक प्रकारची आणि विविध गुणवत्तेची तेलं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुमच्या आरोग्याच्या ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचं तेल यापैकी तेल फायद्याचं आहे ते जाणून घेऊयात
मुंबई : तेलाशिवाय अन्न शिजवणं ही कल्पना आपण भारतीय करूच शकत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास होतो. अशा स्थितीत तुम्हाला आणि तुमच्या हृदयाला स्वस्थ ठेवून हार्ट ॲटॅकचा धोका टाळण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते तेल. बाजारात सध्या अनेक प्रकारची आणि विविध गुणवत्तेची तेलं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुमच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचं तेल यापैकी तेल फायद्याचं आहे ते जाणून घेऊयात.
तेलाशिवाय अन्न शिजवणं ही कल्पना आपण भारतीय करूच शकत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना हृदयविकाराचा त्रास होतो. अशा स्थितीत तुम्हाला आणि तुमच्या हृदयाला स्वस्थ ठेवून हार्ट ॲटॅकचा धोका टाळण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं ते तेल. बाजारात सध्या अनेक प्रकारची आणि विविध गुणवत्तेची तेलं विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुमच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीचं तेल यापैकी तेल फायद्याचं आहे ते जाणून घेऊयात.
advertisement
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल आणि मोहरीच्या तेलामध्ये विविध गुणधर्म आहेत. पण हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीत हे दोन्ही थोडे वेगळे आहेत. ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स विशेषतः ऑलिक ॲसिड, जे खराब कोलेस्टेरॉलची (LDL) पातळी कमी करण्यात आणि चांगल्या कोलेस्टेरॉल (HDL) पातळी वाढवण्यात फायद्याचे ठरतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये पॉलिफेनॉल्स आणि व्हिटॅमिन ई सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात.
advertisement
मोहरीचं तेल
भारतात मोहरीच्या तेलाचा वापार जास्त प्रमाणात होतो.मोहरीच्या तेलात फॅटी ॲसिड्स असतात जे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या बणण्यास प्रतिबंध करू शकतात. मोहरीच्या तेलात अल्फा-लिनोलेनिक (ALA), ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड असतात. हे आवश्यक मेदाम्ल ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्या रोखण्यासाठी महत्वाचे आहेत, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. मोहरीच्या तेलामध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स देखील असतात आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.
advertisement
या एका कारणामुळे धोक्याचं ठरतं मोहरीचं तेल
असं म्हणतात फायदे आणि तोटे या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याचप्रमाणे मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे जरी असले तरीही मोहरीच्या तेलात असलेलं इरूसिक ॲसिड हे हृदयासाठी धोक्याचं आहे किंवा हृदयविकार आहेत त्यांनी मोहरीचं तेल खाणं टाळावं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2024 4:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Olive Oil versus Mustard Oil: ऑलिव्ह ऑईल की मोहरीचं तेल, हृदयासाठी कोणतं तेल फायदेशीर?




