Gajar Mirchi Lonche Recipe : हिवाळ्यात जेवणासोबत खायला चटपटीत हवंच, सोप्या पद्धतीने बनवा गाजर-मिरचीचे लोणचे, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
सध्या बाजारात गाजरांची मुबलक आवक झाली आहे.अनेकजण गाजरापासून हलवा बनवतात, पण आज आपण गाजराची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत.
पुणे: सध्या बाजारात गाजरांची मुबलक आवक झाली आहे. गाजर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. अनेकजण गाजरापासून हलवा बनवतात, पण आज आपण गाजराची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे चटपटीत गाजर-मिरचीचे लोणचे. हे लोणचे तुम्ही सहजपणे महिनाभर वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ सोप्या पद्धतीने गाजर-मिरचीचे लोणचं कसं बनवायचे.
गाजर-मिरचीचे लोणचं बनविण्यासाठी लागणारं साहित्य
गाजर, हिरवी मिरची, लिंबू, तेल, मोहरी, मोहरी डाळ, हिंग, हळद, मिरची पावडर, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
गाजर-मिरचीचे लोणचं कृती
view commentsसुरुवातीला गाजर आणि मिरची स्वच्छ धुवून कपड्याने कोरडी करावीत आणि काप करून ठेवावेत. मोहरी डाळ 10-12 मिनिटं मंद आचेवर भाजून थंड करावी. पाव किलो तेल धूर येईपर्यंत गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद टाकावी. तेल थोडं थंड झाल्यावर लाल तिखट, थंड झालेली मोहरी डाळ आणि मीठ घालून मिक्स करावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर लिंबूरस मिसळावा आणि शेवटी गाजर-मिरचीचे तुकडे घालून मिक्स करावे. एक दिवस मुरू द्यावे आणि दुसऱ्या दिवसापासून स्वादिष्ट गाजर-मिरची लोणचे खायला तयार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:22 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Gajar Mirchi Lonche Recipe : हिवाळ्यात जेवणासोबत खायला चटपटीत हवंच, सोप्या पद्धतीने बनवा गाजर-मिरचीचे लोणचे, रेसिपीचा Video








