Matar Nuggets Recipe : घरातील सर्वच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा खास मटार नगेट्स, रेसिपीचा Video

Last Updated:

हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मटार येत असतात. यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी करत असतो.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात करा हे टेस्टी मटार नगेट्स 

छत्रपती संभाजीनगर: हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मटार येत असतात. यापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी करत असतो. त्यातलीच एक छान अशी रेसिपी म्हणजे मटार नगेट्स. अगदी झटपट असे हे बनवून तयार होतात. त्यासोबत तुमच्या मुलांना देखील खायला खूप असे आवडतात. तर याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
‎मटार नगेट्स साहित्य
एक वाटी मटार, एक बटाटा उकडून घ्यायचा, एक वाटी रवा, जिरे, तीळ, मॅगी मसाला, चाट मसाला, लसूण, तेल, पेरी पेरी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी एवढे साहित्य याकरता तुम्हाला लागणार आहे.
advertisement
मटार नगेट्स कृती
सगळ्यात पहिले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार टाकून घ्यायचे आणि लसूण टाकायचा. त्याला छान बारीक करून घ्यायचे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. त्यात तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाले की जिरे टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचाभर तीळ टाकून घ्यायचे. यानंतर वटाण्याचं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. वरतून मॅगी मसाला टाकायचा साधारण अर्धा चमचा आणि थोडासा चाट मसाला हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं.
advertisement
त्याला दोन मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर रवा घ्यायचा, रवा टाकायचा, सर्व एकजीव करून घ्यायचं. यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी होता कामा नये. याला पाच मिनिटं वाफवून घ्यायचं.
वाफ आल्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचं. त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा. ते सर्व एकजीव करून घ्यायचं. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाले की हे आपण तयार केलेले नगेट्स टाकून घ्यायचे. त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. अशा पद्धतीने नगेट्स बनवून तयार होतात. तयार झालेल्या नगेट्सवरती पेरी पेरी मसाला टाकायचा, चाट मसाला टाकायचा आणि चिमूटभर मीठ टाकून एकजीव करून घ्यायचं. तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. असे हे मटार नगेट्स बनून तयार होतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Matar Nuggets Recipe : घरातील सर्वच खातील आवडीने, हिवाळ्यात बनवा खास मटार नगेट्स, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement