Poha Bhaji Recipe: पावसाळ्यात मिळणार आता नवा स्वाद, कुरकुरीत पोह्यांची भजी झटपट बनवा घरीच, रेसिपीचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
नेहमीचे कांदाभजी, बटाटाभजी यांचे पर्याय आता सगळ्यांना माहीत झाले आहेत. मात्र यंदाच्या पावसाळ्यात आपल्या ताटात एक नवीन, खास आणि चविष्ट पर्याय म्हणून तुम्ही पोह्यांचे कुरकुरीत भजी बनवू शक्यता.
मुंबई: पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा पसरतो आणि प्रत्येक घरात गरमागरम चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत खाण्याची मज्जा घेतली जाते. नेहमीचे कांदाभजी, बटाटाभजी यांचे पर्याय आता सगळ्यांना माहीत झाले आहेत. मात्र यंदाच्या पावसाळ्यात आपल्या ताटात एक नवीन, खास आणि चविष्ट पर्याय म्हणून तुम्ही पोह्यांचे कुरकुरीत भजी बनवू शक्यता.
सकाळच्या नाश्त्याचा प्रमुख घटक असलेल्या पोह्यांचा आता एक नवा उपयोग खवय्यांना खुणावत आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि अधिक चव यामुळे ही भजी कोणाच्याही मनात झटकन घर करून जाते. विशेष म्हणजे ही रेसिपी अगदी सोपी आहे. ही रेसीपी बनवायची कशी? याबद्दलचं आपल्याला गृहिणी वैष्णवी कांबळे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
पोह्यांचे कुरकुरीत भजी बनवण्यासाठी साहित्य
advertisement
पोह्यांचे भजी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम पोहे स्वच्छ धुऊन थोडा वेळ भिजत ठेवा. नंतर एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवलेले पोहे, चिरलेला कांदा, मिरच्या, आले-लसूण पेस्ट, जिरे, लाल तिखट, बेसन पीठ आणि मीठ एकत्र करा. या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालत जाडसर मिश्रण तयार करा.
advertisement
एका कढईत तेल गरम करा. मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार करून गरम तेलात तळा. भजे छान लालसर आणि कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा. गरमागरम पोह्यांचे भजे टोमॅटो सॉस किंवा आवडीनुसार चटणीसोबत सर्व्ह करा.
या भज्यांमध्ये पोह्यांचा हलकाफुलका स्वाद, कांद्याची गोडसर चव आणि मसाल्यांची झणझणीत चव एकत्रितपणे खवय्यांच्या जिभेवर रेंगाळते. त्यामुळेच हे नवे स्नॅक्स लवकरच प्रत्येक घरात पावसाळ्याचा खास भाग ठरणार यात शंका नाही. यंदा पावसाच्या सरींसोबत पोह्यांच्या कुरकुरीत भज्यांचा नवा अनुभव घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 18, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Poha Bhaji Recipe: पावसाळ्यात मिळणार आता नवा स्वाद, कुरकुरीत पोह्यांची भजी झटपट बनवा घरीच, रेसिपीचा Video