Famous Bread Patties Pune: पारंपरिक अस्सल चव, ब्रेड पॅटिस खावा तर पुण्यात इथंच, असते मोठी गर्दी

Last Updated:
मागील 50 वर्षांपासून सुरू असलेले हे खाद्यपदार्थाचे ठिकाण आजही आपल्या ब्रेड पॅटिस आणि पारंपरिक चवीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.
1/7
 पुणे शहर हे आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीसाठी ओळखले जातं. याठिकाणी अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. या ठिकाणचे व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालत आले असून, त्यांनी पुणेकरांच्या मनात आणि जिभेवर आपली खास जागा निर्माण केली आहे.

advertisement
2/7
 असेच एक ठिकाण म्हणजे कापडगंज पेठेतील सोनल स्नॅक्स. मागील 50 वर्षांपासून सुरू असलेले हे खाद्यपदार्थाचे ठिकाण आजही आपल्या ब्रेड पॅटिस आणि पारंपरिक चवीने प्रसिद्ध आहे. त्यामुळे खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते.

3/7
पारंपरिक चव जपलीये प्रेमाने: या व्यवसायाची सुरुवात 1974 साली हातगाडीवरून करण्यात आली होती. सुरुवातीचे काही वर्षे सूर्यवंशी कुटुंबाने रस्त्यावर हातगाडीवरून पदार्थ विक्री केली.

4/7
नंतर 1990 साली त्यांनी सोनल स्नॅक्स या नावाने दुकान सुरू केले. दुकानाच्या पाठीमागे असलेला वाडा सुमारे 90 वर्षे जुना असून त्याच परिसरात हे दुकान कार्यरत आहे. सध्या या व्यवसायाची धुरा दुसऱ्या पिढीकडे आली असून, त्यांनी ही पारंपरिक चव तितक्याच प्रेमाने जपली आहे.

5/7
पुणेकरांची असते ब्रेड पॅटिस खाण्यासाठी मोठी गर्दी: सोनल स्नॅक्समध्ये मिळणारा ब्रेड पॅटिस हा इथला खास आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक पॅटिसमध्ये भरपूर बटाटा मसाला, खमंग चव आणि परिपूर्ण खवखवीतपणा हे गुणधर्म जपले जातात. पुणेकर या चवीने इतके मंत्रमुग्ध झाले आहेत की, वर्षानुवर्षे एकच ब्रेड पॅटिस खाण्यासाठी लोक इथे आवर्जून येतात.

6/7
व्यवसाय प्रामाणिकपणे आजही चालू: गेली पाच दशके आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत आलो आहोत. आज जेव्हा आधुनिक स्नॅक्स आणि फास्ट फूडचा जमाना आहे, तेव्हा सोनल स्नॅक्ससारखे ठिकाण आपल्या जुन्या आठवणी जागवणारे आणि अस्सल चव जपणारे ठिकाण बनले आहे.

7/7
 हे दुकान केवळ खाद्यपदार्थांचे नव्हे तर पुण्याच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे एक जिवंत उदाहरण आहे, असं सुरेश सूर्यवंशी सांगतात.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement