Summer Recipe : बघताच तोंडाला सुटेल पाणी, चविष्ट अशी कैरीची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अगदी घरगुती साहित्य वापरून कमीत कमी वेळात ही कैरीची चटणी तयार होते. खोबरं आणि कोथिंबीर घालून बनवलेली ही चटणी अतिशय रुचकर लागते.
अमरावती : उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे लोणचे तर आपण बनवून ठेवतोच. पण, जेवणासोबत काही तरी वेगळं म्हणून काय बनवायचं? हा प्रश्न अनेक वेळा गृहिणींना पडतो. अशा वेळी तुम्ही झटपट तयार होणारी चविष्ट अशी कैरीची चटणी बनवू शकता. अगदी घरगुती साहित्य वापरून कमीत कमी वेळात ही चटणी तयार होते. खोबरं आणि कोथिंबीर घालून बनवलेली ही चटणी अतिशय रुचकर लागते. त्याची रेसिपी अमरावतीमधील गृहिणी मंदा यांनी सांगितली आहे.
कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
बारीक काप केलेली कैरी, बारीक काप केलेलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कडीपत्ता, लसूण, साखर, तेल, जिरे, मोहरी हे साहित्य लागेल.
कैरीची चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी कैरीचे बारीक काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर खोबऱ्याचे सुद्धा बारीक काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कापलेली कैरी टाकून घ्यायची. त्यानंतर खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घ्यायचा. त्यानंतर ते सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित बारीक करायचं आहे. त्यानंतर त्यात टाकून घेण्यासाठी तडका तयार करायचा आहे.
advertisement
त्यासाठी गॅसवर भांडे ठेवून त्यात तेल टाकायचं आहे. तेल थोडं गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कडीपत्ता टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं. ते थोडं परतवून घेतलं की तडका तयार होईल. त्यानंतर गॅस बंद करून द्यायचा. नंतर त्यात बारीक करून घेतलेलं मिश्रण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटपटीत आणि चविष्ट अशी आंबट गोड कैरीची चटणी तयार होईल. ही चटणी तुम्ही कमीत कमी वेळात अगदी घरगुती साहित्यापासून बनवू शकता.
advertisement
view comments
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
May 16, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Summer Recipe : बघताच तोंडाला सुटेल पाणी, चविष्ट अशी कैरीची चटणी, रेसिपीचा संपूर्ण Video









