Parenting Mistakes : पालकांनी करू नयेत या 10 चूका, नाहीतर मुलांचा आत्मविश्वास होतो कमी
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मुलांभोवती अनेक लोक असले तरी त्यांचं जग त्यांच्या पालकांपासूनच सुरू होतं आणि तिथेच संपतं. त्यामुळे पालकांच्या प्रत्येक शब्दाचा, कृतीचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. आपण त्यांच्याशी कसे वागत आहोत, याचा त्यांच्या मानसिक विकास आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. काही वेळा पालक चांगल्या हेतूने मुलांना टोमणे मारतात किंवा सल्ला देतात. पण सतत टीका करणे, कमीपणा दाखवणे यामुळे मुलं आपल्यापासून दूर जातात. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि त्यांना कमीपणाची भावना निर्माण होते. या परिस्थितीत पालकांनी थोडा बदल करावा, मुलांना चांगले वातावरण आणि आधार द्यावा. त्यांचे आत्मसन्मान वाढवण्यासाठी आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींवर मुलांना टोचून बोलणे टाळा.
चेहरा किंवा वजनाबाबत टोमणे मारू नका : मुलांच्या रूप किंवा वजनाबाबत मजाक किंवा टीका करू नका. हे त्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम करू शकते आणि त्यांना सतत निराश वाटू शकते.
चुका वारंवार आठवून देऊ नका : मुलांच्या चुका वारंवार समोर आणल्यास त्यांना कमीपणाची भावना निर्माण होते. त्याऐवजी त्यांच्या चांगल्या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करा.
advertisement
आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करू नका: मुलांच्या छंद किंवा आवडीनिवडींना कमी लेखल्यास त्यांच्या सर्जनशीलतेवर परिणाम होऊ शकतो.
अभ्यासावरून सतत बोलू नका : मुलांच्या शाळेतील कामगिरीवर नेहमी नकारात्मक बोलू नका. यामुळे त्यांना मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.
मित्रांवरून रागावू नका : मुलांच्या मित्रांबाबत वाईट बोलण्याआधी त्यांच्या भावना लक्षात घ्या. मित्र त्यांच्या आयुष्यात महत्वाचे भाग असतात.
advertisement
इतर मुलांशी तुलना टाळा : आपल्या मुलांची इतर मुलांच्या यशाशी तुलना करणे चुकीचे आहे. यामुळे मुलांना कमीपणाची भावना निर्माण होऊ शकते.
भावनांकडे दुर्लक्ष करू नका : मुलं आपल्या भावना व्यक्त करत असतील तर त्यांना दुर्बल समजणे चुकीचे आहे. त्यांना मोकळेपणाने बोलण्याची संधी द्या.
निर्णय स्वातंत्र्य द्या : मुलांना त्यांच्या निर्णयांमध्ये सहभागी होऊ द्या. वारंवार हस्तक्षेप केल्यास त्यांच्यातील आत्मनिर्भरता कमी होते.
advertisement
सन्मान ठेवा : त्यांच्या गोष्टी तपासणे विश्वास कमी करते. त्यांच्यावर शंका घेणार्या गोष्टी करू नका.
सामाजिक कौशल्यांवर टिप्पणी करू नका : मित्रांच्या बाबतीत नकारात्मक गोष्टी सांगणे त्यांचा आत्मविश्वास कमी करते. वरील बाबींवर लक्ष दिल्यास मुलं आपल्या जवळीक वाढवतील आणि आपल्याशी मोकळेपणाने संवाद साधतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2024 5:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Parenting Mistakes : पालकांनी करू नयेत या 10 चूका, नाहीतर मुलांचा आत्मविश्वास होतो कमी







