जेवण बनवल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? 99 टक्के लोक करतात चूक, ICMR ने केलं मार्गदर्शन

Last Updated:

तेल सारखं गरम केल्याने त्यातून विषाप्त पदार्थ रिलीज होतात. ज्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढते आणि परिणामी अवयवांना सूज येणे क्रोनिक डिसीज सारखेच आजार होऊ शकतात.

जेवण बनवल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? 99 टक्के लोक करतात चूक
जेवण बनवल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? 99 टक्के लोक करतात चूक
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने नुकतेच जाहीर केलेल्या निर्देशनानुसार वनस्पती किंवा कोणत्याही प्रकारचं तेल पुन्हा पुन्हा गरम करून त्याच सेवन करू नये. सारखं गरम केलेल्या तेलात बनवलेले पदार्थ खाल्ल्याने हृदय रोग आणि कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. तेल सारखं गरम केल्याने त्यातून विषाप्त पदार्थ रिलीज होतात. ज्यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्सचे प्रमाण वाढते आणि परिणामी अवयवांना सूज येणे क्रोनिक डिसीज सारखेच आजार होऊ शकतात.
तेल सारखं गरम केल्याने काय होईल?
ICMR ने सांगितल्या प्रमाणे वनस्पती तेल सारखं गरम केल्याने त्यात हानिकारक घटक निर्माण होतात. ज्यामुळे हृदय रोग किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो. उच्च तापमानात तेलातील काही चरबी ट्रान्स फॅटमध्ये बदलतात. ट्रान्स फॅट्स ही हानिकारक चरबी आहे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा तेलांचा पुनर्वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढते.
advertisement
अनेकदा तळण्यासाठी खूप तेल कढईत गरम केलं जात मात्र त्याचा वापर नंतर होत नाही. ICMR ने सांगितल्या प्रमाणे तुम्ही असे तेल भाजी किंवा डाळ बनवण्यासाठी वापरू शकता. तसेच एकदा तेल तळण्यासाठी वापरल्यावर त्या तेलाचा वापर पुन्हा तळण्यासाठी करू नये. तसेच एकदा वापरलेलं तेल हे जास्तीत जास्त एक ते दोन दिवस वापरावे.
advertisement
कोणत्या तेलाचा वापर करावा?
वनस्पती तेल सारखे गरम केल्याने त्यात ट्रान्स फॅट्सचं प्रमाण वाढू शकत. ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढा वापर आहे तेवढ्याच तेलाचा वापर करावा. कॅन्सर आणि हृदयविकाराचे धोके टाळण्यासाठी एकाच तेलाचा जेवण बनवण्यासाठी सारखा वापर करणे टाळा. तुम्ही ॲव्होकॅडो किंवा करडई तेल यांसारखे उच्च धुराचे तेल वापरणे योग्य ठरू शकते. तसेच तेल योग्य तापमानावर तापवणे सुद्धा महत्वाचे आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी जेवणकरता ताज्या तेलाचा वापर करावा. जर तुम्ही हे तेल जेवणासाठी वापरणार नसाल तर दिवा पेटवण्यासाठी सुद्धा तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जेवण बनवल्यावर उरलेल्या तेलाचं काय करायचं? 99 टक्के लोक करतात चूक, ICMR ने केलं मार्गदर्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement