आंगणेवाडी जत्रेसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मोठा झटका, तांत्रिक बिघाडाने रेल्वे वाहतूक विस्कळीत
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वंदे भारत एक्सप्रेसला तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भाविकांना मोठा फटका बसला आहे.
Anganewadi Yatra : कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील मसूरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सवाला आज 9 फेब्रुवारीपासून सूरूवात झाली आहे. या यात्रेसाठी मोठ्या संख्यने चाकरमानी मुंबईहून कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. तर काही परतीच्या प्रवासालाही लागले आहेत. याच प्रवाशांना आता मोठा धक्का बसला आहे. कारण वंदे भारत एक्सप्रेसला तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भाविकांना मोठा फटका बसला आहे.
राज्यात जिल्हा परिषद पंचायत समीतीच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच आंगणेवाडीची जत्रेला सूरूवात झाली आहे. या जत्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक कोकणात गेले आहेत. तर काही जणांनी आज प्रवासाला देखील सूरूवात केली होती. पण मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाली आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.त्यामुळे गाड्या सूमारे चार ते पाच तास उशिराने धावतायत आणि कोकण रेल्वचे वेळापत्रक कोलंमडलं आहे. त्यामुळे आंगणेवाडी जत्रेसाठी आलेल्या भाविकांचा यामुळे मोठा खोळंबा झाला आहे. तसेच प्रवाशांना ताटकळत स्थानकात उभं रहावं लागत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आंगणेवाडी जत्रेसाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना मोठा झटका, तांत्रिक बिघाडाने रेल्वे वाहतूक विस्कळीत







