राजकारणात खळबळ! भाजपच्या महिला नेत्यासाठी टाकलं जाळ, मागितली 30 लाखांची खंडणी, चार महिन्यांपासून...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचोरा येथील भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळातून खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचोरा येथील भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. सूर्यवंशी यांना ब्लॅकमेलिंग करत अज्ञाताने ३० लाखांची खंडणी मागितली होती. मागील चार महिन्यांपासून आरोपी ब्लॅकमेल करत होता. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून भाजप नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमन नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. अमन हा वैशाली सूर्यवंशी यांना मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमक्या देत होता. त्याने सोशल मीडियावर बदनामीसह ड्रग्ज प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. विधानसभा निवडणुकीत पैसे वाटल्याची बनावट संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर टाकण्याची, तसेच निवडणूक आयोग, CBI, ED आणि इन्कम टॅक्सकडे तक्रार करण्याचीही धमकी आरोपीनं दिली होती.
advertisement
एका राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला नेत्यालाच अशाप्रकारे ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली सूर्यवंशी यांना अमन नावाच्या व्यक्तीने विविध मोबाईल क्रमांकावरून मागील चार महिन्यापासून सतत फोन आणि व्हॉट्सअॅप मेसेज करून धमक्या दिल्या.
एवढेच नव्हे तर, गाडीमध्ये ड्रग्ज ठेऊन अडचणीत आणण्याची धमकी देखील देण्यात आली. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोरा भडगाव मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी आता नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
view commentsLocation :
Pachora,Jalgaon,Maharashtra
First Published :
October 10, 2025 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राजकारणात खळबळ! भाजपच्या महिला नेत्यासाठी टाकलं जाळ, मागितली 30 लाखांची खंडणी, चार महिन्यांपासून...