पत्नी माहेरी जाऊन बसली, पतीची सटकली; मध्यरात्री गेला अन् केलं असं, सासरवाडीत पळापळ!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: ‘तुम्ही माझी जिंदगी बरबाद केली आहे. तुम्ही माझ्या बायकोला का पाठवत नाही?’ असा सवाल घरापुढे उभा राहूनच संतापलेल्या जावयाने केला.
छत्रपती संभाजीनगर: पत्नी माहेरी नव्हती, त्यामुळे संतापलेल्या पतीने मित्राला सोबत घेतलं आणि थेट मध्यरात्रीच सासरवाडी गाठली. कौटुंबिक वादाच्या रागानं डोकं फिरलं आणि त्यानं थेट घरावर दगडफेक सुरू केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरात खळबळ उडाली.
मुकुंदवाडी परिसरातील समतानगर येथे राहणाऱ्या मंदा अंबादास खरात (वय 65) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार 16 फेब्रुवारी रोजी रात्री त्या पतीसह घरी होत्या. तेव्हा अचानक दरवाजा वाजवल्याचा आवाज आला. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांचा नातजावई संघर्ष बोर्डे व त्याचा मित्र महेश हेल्लोडे हे घराबाहेर उभे असल्याचे दिसले.
advertisement
संघर्ष बोर्डे हा घरासमोर उभा राहून शिवीगाळ करत होता. ‘तुम्ही माझी जिंदगी बरबाद केली आहे. तुम्ही माझ्या बायकोला का पाठवत नाही?’ असा सवाल त्याने केला. त्यावर मंदा खरात यांनी, “तुझा आणि तुझ्या पत्नीचा वाद कोर्टात सुरू आहे. कोर्टात जाऊन प्रश्न सोडव. मला विनाकारण इतक्या रात्री त्रास देऊ नको,” असे सांगितले.
advertisement
या उत्तरानंतर संतप्त झालेल्या संघर्ष बोर्डे आणि त्याचा मित्र महेश हेल्लोडे यांनी घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दोघांनी “तुम्हाला जिवंत सोडणार नाही, तसेच तुझे दोन्ही मुलांनाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. दगडफेकीत घराच्या खिडक्यांचे काच, टॉवरचे काच आणि घरावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे यांचे नुकसान झाले. या घटनेत अंदाजे 25 ते 30 हजार रुपयांची हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement
या प्रकरणी मंदा खरात यांच्या तक्रारीवरून नातजावई संघर्ष बोर्डे आणि त्याचा मित्र महेश हेल्लोडे या दोघांविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 1:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पत्नी माहेरी जाऊन बसली, पतीची सटकली; मध्यरात्री गेला अन् केलं असं, सासरवाडीत पळापळ!








