आईवडील मजुरीला गेले, वृद्ध आजोबा झोपलेले, 14 वर्षाच्या मुलीनं केलं असं, अख्खं गाव हादरलं!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: अपूर्वा ही शाळेत नेहमी पहिल्या पाच क्रमांकांत असणारी, अभ्यासू आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती.
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात शालेय विद्यार्थी देखील किरकोळ कारणातून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रे येथे घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. ज्या वयात भविष्याची स्वप्ने रंगवली जातात, त्या कोवळ्या वयात तिने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे गावात तसेच शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे
अपूर्वा रमेश चंदनशिवे (वय 14) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वा ही आई-वडील, आजी-आजोबा यांच्यासह राहत होती. बुधवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली नव्हती. तिचे आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरात तिचे वृद्ध आजोबा झोपलेले होते, तर आजी अंगणवाडीत मदतीसाठी गेलेल्या होत्या. घरात इतर कोणी नसल्याची वेळ साधून तिने गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
advertisement
दरम्यान, आजी घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा करताच शेजाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि अपूर्वाला सिल्लोड येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले
अपूर्वा ही शाळेत नेहमी पहिल्या पाच क्रमांकांत असणारी, अभ्यासू आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिच्या शिक्षकांनी ती अत्यंत हुशार व शिस्तप्रिय असल्याची आठवण व्यक्त केली. तिच्या आकस्मिक निधनाने वर्गमित्र, शिक्षक आणि गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
दरम्यान, इतक्या लहान वयात अपूर्वाने टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक लहू घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 19, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईवडील मजुरीला गेले, वृद्ध आजोबा झोपलेले, 14 वर्षाच्या मुलीनं केलं असं, अख्खं गाव हादरलं!









