IPL 2026 : 'मला खेळायला द्या...', RCB चा स्टार कोर्टात, आयपीएल सुरू होताच मोठी कॉन्ट्रोव्हर्सी!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 चा मोसम सुरू झाला असून सर्व 10 टीमनी त्यांच्या पहिल्या मॅच खेळल्या आहेत. गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात या मोसमाचा पहिला सामना झाला.
मुंबई : आयपीएल 2026 चा मोसम सुरू झाला असून सर्व 10 टीमनी त्यांच्या पहिल्या मॅच खेळल्या आहेत. गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात या मोसमाचा पहिला सामना झाला, ज्यात आरसीबीने दणदणीत विजय मिळून मोसमाची सुरूवात केली, पण आरसीबीच्या टीमला मोसमाच्या आधीपासूनच दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. टीमचा हुकमी एक्का असलेला जॉश हेजलवूड अजूनही फिट झालेला नाही, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जॉश हेजलवूडला खेळण्याची परवानगी दिलेली नाही.
आरसीबीचा स्टार कोर्टात
जॉश हेजलवूडच्या गैरहजेरीमध्ये आरसीबीला श्रीलंकेचा फास्ट बॉलर नुवान तुषाराकडून अपेक्षा होत्या, पण नुवान तुषारालाही श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने खेळण्यासाठी एनओसी दिलेली नाही, त्यामुळे तो अजूनही आरसीबीच्या टीममध्ये सामील झालेला नाही. एनओसी मिळत नसल्यामुळे आता नुवान तुषारा कोर्टात गेला आहे.
फिटनेस टेस्ट पास न झाल्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवान तुषाराला एनओसी दिली नाही. 31 वर्षांच्या तुषाराला आरसीबीने विकत घेतलं आहे. नुवान तुषाराने कोलंबोच्या जिल्हा न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली आहे, तसंच बोर्डाला एनओसी द्यायचे आदेश दिले जावेत, अशी मागणी केली आहे. 9 एप्रिलला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
advertisement
श्रीलंकेतील स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार नुवान तुषाराचा श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबतचा करार 31 मार्चला संपला होता, तसंच हा करार पुढ न वाढवण्याचा निर्णय तुषाराने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला खेळायचं नसल्याचं तुषाराने बोर्डाला सांगितलं आहे. या परिस्थितीमध्ये आपल्याला एनओसी दिलं गेलं पाहिजे, असा दावा तुषाराने न्यायालयात केला आहे.
आरसीबीने मोजले 1.60 कोटी
advertisement
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्याला याच फिटेनस स्तरावर खेळण्याची परवानगी दिली होती, असंही तुषारा म्हणाला आहे. आरसीबीने नुवान तुषाराला आयपीएल 2025 मध्ये 1.60 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएल 2025 मध्ये तुषारा आरसीबीकडून फक्त एक मॅच खेलला, त्याआधी 2024 मध्ये तुषारा मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता, तेव्हा त्याला 7 मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. तुषाराने आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्याला 9 विकेट घेण्यात यश आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 8:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'मला खेळायला द्या...', RCB चा स्टार कोर्टात, आयपीएल सुरू होताच मोठी कॉन्ट्रोव्हर्सी!






