3200000000000 रुपयांचं पॅकेज, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा, नेमकी प्रक्रिया कशी असणार?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पूर्वी घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई: मागील काही दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाने आणि अवकाळी पावसानं झोडपलं आहे. राज्यातील बहुतांशी शेतजमीन पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे सगळा खरीप हंगाम वाया गेला आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी मागणी आता राज्यात जोर धरू लागली आहे. यासाठी बच्चू कडू यांनी मोर्चा देखील काढला.
यानंतर आता गुरुवारी रात्री उशिरा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पूर्वी घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे. एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.
advertisement
गुरुवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह यांच्यासह विविध मंत्री आणि सर्व प्रमुख विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आणि आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, "नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता 32,000 कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे. पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून 32 हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत 8000 कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत. या आठवड्याअखेर 18,500 कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात 90 टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत."
advertisement
मुख्यमंत्री म्हणाले," आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे "
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 8:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
3200000000000 रुपयांचं पॅकेज, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा, नेमकी प्रक्रिया कशी असणार?


