advertisement

रोहित पवारांच्या स्फोटक परिषदेनंतर 2 तासातच DGCA चा मोठा निर्णय, VSR विमान कंपनीचा काऊंटडाऊन सुरू

Last Updated:

बारामतीत अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA चे मोठे पाऊल उचलले आहे.

News18
News18
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
पुणे : 28 जानेवारी 2026 बारामतीच्या विमानतळाजवळ लँडिंगच्या वेळी भीषण विमान अपघात झाला. त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सरकारी यंत्रणा, DGCA आणि सगळ्यांनी याला अपघात म्हटलं मात्र
आमदार रोहीत पवारांनी आज तो अपघात नव्हता तर घात होता अशी शंका उपस्थित करून एकच खळबळ उडवून दिलीय. त्यासाठी त्यांनी काही तांत्रिक मुद्द्यांसह, काही घटना मांडल्या आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की तो कसा घातपात होता., यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर मोठी खळबळ उडाली. दरम्यान आता बारामती विमान अपघातानंतर DGCA चे मोठे पाऊल उचलले आहे.
advertisement
बारामती येथे झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने मोठी कारवाई सुरू केली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीमध्ये M/s VSR Ventures Pvt Ltd या कंपनीचं Learjet 45 (VT-SSK) विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर, DGCA ने गैर-निर्धारित म्हणजेच नॉन-शेड्यूल विमान ऑपरेटरांचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. DGCA कडून हे विशेष सेफ्टी ऑडिट टप्प्याटप्प्याने राबवले जात असून, 4 फेब्रुवारी 2026 पासून या ऑडिटची सुरुवात झाली आहे.
advertisement

VSR चं ऑडिट  होणार 

पहिल्या टप्प्यात मोठ्या ऑपरेटरांचा समावेश करण्यात येत आहे. M/s VSR Ventures Pvt Ltd या कंपनीचाही या ऑडिटमध्ये समावेश आहे. DGCA च्या या कारवाईचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षा निकषांची सखोल तपासणी करणे आणि भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळणे हा आहे. बारामती विमान अपघातानंतर DGCA ने उचललेलं हे पाऊल नॉन-शेड्यूल विमानसेवेच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचं मानलं जात आहे.
advertisement

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवारांच्या अपघातानंतर 13 दिवस उलटले तरी सरकारनं सखोल चौकशी का सुरू केली नाही? आणि सर्वात मोठा प्रश्न सीआयडीला विमान अपघाताचा तपास करण्याचा अधिकार आहे का? हे सगळं एकत्र जोडत रोहीत पवार यांनी एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला की अजित दादांचा केवळ अपघात नव्हता, तर तो एक नियोजित कट होता. आत सख्खा पुतण्या रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहित पवारांच्या स्फोटक परिषदेनंतर 2 तासातच DGCA चा मोठा निर्णय, VSR विमान कंपनीचा काऊंटडाऊन सुरू
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement