advertisement

Pune : नवरा आवडला नाही... लग्नाच्या 3 दिवसांनी पत्नीचा ड्रामा, कारण ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली

Last Updated:

नवरा आवडला नाही म्हणून लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीने पतीला नाकारल्याची घटना पुण्यात घडली आहे.

नवरा आवडला नाही... लग्नाच्या 3 दिवसांनी पत्नीचा ड्रामा, कारण ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली (AI Image)
नवरा आवडला नाही... लग्नाच्या 3 दिवसांनी पत्नीचा ड्रामा, कारण ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली (AI Image)
पुणे : नवरा आवडला नाही म्हणून लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नीने पतीला नाकारल्याची घटना पुण्यात घडली आहे. लग्न झाल्यानंतर पतीने पत्नीसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच पत्नीने आपल्याला हे लग्न मान्य नाही. आई-वडिलांच्या दबावामुळे आपण हे लग्न केल्याचं सांगितलं. पत्नीचे हे शब्द ऐकून पतीच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न झाल्याच्या 20 दिवसांमध्येच पत्नी माहेरी निघून गेली आणि परत सासरी परतली नाही.
पतीने अखेर न्यायालयात धाव घेतली आणि लग्न रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने फक्त 7 महिने आणि 16 दिवसांमध्ये हा दावा निकाली काढून लग्न रद्द केलं. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी.कदम यांनी हा निर्णय दिला.
27 वर्षांचा पती आणि 24 वर्षांच्या पत्नीचं लग्न जून 2024 मध्ये झाला होता, पण लग्नानंतर मुलीने संबंध प्रस्थापित करायला नकार दिला. तसंच आई-वडिलांच्या जबरदस्तीमुळे हे लग्न झालं असून, मला हे लग्न मान्य नाही, असं मुलीने पतीला सांगितलं. यानंतर पत्नी 20 दिवसांमध्येच नवऱ्याचं घर सोडून गेली होती. पत्नी घरी येत नसल्याचं लक्षात येताच पतीने मे 2025 मध्ये न्यायालयात धाव घेतली आणि लग्न रद्द करण्याची मागणी केली. पतीची ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
advertisement

पुण्यात दुसरी घटना

याआधी डिसेंबर महिन्यामध्येही पुण्यातच प्रेम विवाह केलेल्या जोडप्याने 24 तासांमध्येच कायदेशिररित्या त्यांचं लग्न संपवण्याचा निर्णय घेतला होता. हे दोघेही जण एकमेकांना दोन ते तीन वर्षांपासून ओळखत होते, यानंतर त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं होतं. लग्न केलेली महिला पेशाने डॉक्टर तर पुरुष इंजिनिअर आहे. फक्त वैचारिक मतभेद असल्याच्या कारणामुळेच दोघांनी विभक्त व्हायचा निर्णय घेतला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : नवरा आवडला नाही... लग्नाच्या 3 दिवसांनी पत्नीचा ड्रामा, कारण ऐकून पतीच्या पायाखालची जमीन सरकली
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement