Turmeric Milk Side Effects : रोज हळदीचं दूध पिता? तुमची 'ही' एक चूक सर्व फायद्यांवर पडू शकते भारी, वाढवेल शरीराचे त्रास!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Turmeric Milk Side Effects : हळदीचे दूध आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे बरेच लोक ते रोज पितात. त्याचा आपल्या शरीराला निश्चितच फायदा होतो. शरीराचे छोटे छोटे त्रासही नाहीसे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुमची एक चूक त्या हळदीच्या दुधाच्या सर्व फायद्यांवर भारी पडते आणि यामुळे तुम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
advertisement
advertisement
नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाच्या प्रमुख आहारतज्ञ चारू सदाना यांनी सांगितले, 'हळदीमधील कर्क्यूमिन पचन आणि आराम करण्यास मदत करते. मात्र ते झोपण्याच्या जस्ट आधी आणि मोठ्या जेवणानंतर प्यायल्यास, त्याने त्रास होऊ शकतो. कर्क्यूमिन पित्त उत्पादनास उत्तेजन देते, ज्यामुळे काही लोकांना झोपताना अस्वस्थता किंवा ऍसिड रिफ्लक्स निर्माण होण्याची शक्यता असते.'
advertisement
'दूध हे जड अन्न आहे. म्हणून ते पचवण्यासाठी पुरेशी पचनक्रिया आवश्यक असते. मात्र रात्री नैसर्गिकरित्या पचन मंदावते. अशावेळी झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास त्यामुळे पोटात सूज येणे, आम्लता किंवा ऍसिड रिफ्लक्स निर्माण करू शकते.' असे नवी दिल्ली येथील PSRI हॉस्पिटलमधील GI सर्जरी आणि यकृत प्रत्यारोपण आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. भूषण भोळे यांनी सांगितले.
advertisement
advertisement
हळदीचे दूध पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ : रात्रीच्या जेवणानंतर लगेच दूध प्यायल्याने कॅलरीज तर वाढतातच, शिवाय तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने पोटात सूजही येऊ शकते. म्हणून कॅलरीजची चिंता असेल तर रात्रीच्या जेवणापूर्वी दूध पिणे चांगले. यामुळे तुम्ही जेवणही कमी कराल. कारण दुधाने तुमचे पोट आधीच भरलेले असेल.' असे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुदीप खन्ना यांनी सांगितले.
advertisement
advertisement









