जालन्यात प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर जीवघेणा हल्ला, CCTV VIDEO आला समोर

Last Updated:

Crime in Jalna: जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.

News18
News18
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर सात ते आठ जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपींनी दुचाकीने पाठलाग करत मित्तल यांच्या पुतण्याची कार अडवली. यानंतर त्यांना कारमधून बाहेर काढत बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रसिद्ध उद्योगपतींच्या पुतण्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला केल्याने जालना शहरात खळबळ उडाली आहे.

उद्योगपतींचा पुतण्या यश मित्तलवर जीवघेणा हल्ला

यश मित्तल असं हल्ला झालेल्या उद्योगपती मित्तल यांच्या पुतण्याचं नाव आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी पाडव्याच्या रात्री यश मित्तल हे गुजरात पासिंगचा नंबर असलेल्या आपल्या चारचाकी गाडीतून पत्नीसह घरी परतत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या सात ते आठ गुंडांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यांनी यश मित्तल यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली, ज्यामुळे यश मित्तल गंभीर जखमी झाले. मारहाणीदरम्यान आरडाओरड झाल्याने गुंडानी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला.
advertisement

यश मित्तल हल्ल्यात गंभीर जखमी

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यश मित्तल यांना तातडीने उपचारासाठी संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

रोहित पवारांकडून सरकारवर टीका

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज ट्विट करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. "एकेकाळी कायदा व सुव्यवस्थेसाठी पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता भ्रष्टाचारात आणि बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर गेल्याचं राज्यात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून सिद्ध होतं. जालन्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर ऐन दिवाळीत कसा जीवघेणा हल्ला करण्यात आला... याचं हे फुटेज बघा... या गाडीतील महिला जिवाच्या आकांताने ओरडत असताना गुंड मात्र जीवघेणा हल्ला करत होते.याला पूर्णतः हे अकार्यक्षम सरकार आणि गृहमंत्रालय जबाबदार आहे. राज्यातील जनतेने आणखी किती दिवस जीव मुठीत धरून जगायचं?" असा सवाल रोहित पवारांनी विचारला.
advertisement
advertisement
दरम्यान, या धक्कादायक घटनेची नोंद सदर बाजार पोलिसांनी घेतली असून, त्यांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. भर वस्तीत आणि दिवाळीच्या दिवशी झालेल्या या हल्ल्यामुळे जालना शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जालन्यात प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर जीवघेणा हल्ला, CCTV VIDEO आला समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement