advertisement

तो दिवस मोठा कठीण होता, परिस्थिती बिघडली असती तिथेच…जालन्यातील कारसेवकांनी सांगितला तो थरारक अनुभव

Last Updated:

अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला तिथे भव्य दिव्य राम मंदिर उभे राहावे अशी अपेक्षा बाळगून असलेल्या हजारो कारसेवकांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.

+
News18

News18

जालना : मोक्षदायिनी एकादशीचा तो दिवस. 6 डिसेंबर 1992 रोजी हजारो कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विवादित ढाचा नष्ट केला. राम मंदिर निर्मितीच्या दिशेने पडलेलं हे एक पहिलं पाऊल होतं. अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला तिथे भव्य दिव्य राम मंदिर उभे राहावे अशी अपेक्षा बाळगून असलेल्या हजारो कारसेवकांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. अयोध्येमध्ये रामाचं भव्य असं मंदिर तर उभं राहीलच त्याचबरोबर मंदिरावर धर्म ध्वज देखील मोठ्या दिमाखात फडकवण्यात आला. 6 डिसेंबरचा तो दिवस आणि धर्मध्वज दिमाखाने फडकत असलेला आजचा दिवस याबद्दल स्वतः कार सेवा करणाऱ्या कारसेवकांना काय वाटतं हे लोकल 18 ने जाणून घेतलं, पाहुयात.
जालना शहरामधून भगवान बाबा आनंदगडकर यांच्या नेतृत्वात दोन ते अडीच हजार कारसेवक अयोध्या येथे दाखल झाले होते. बाबरी मशिदीचा विध्वंस करत असताना रामललाची बालपणीची लहानशी मूर्ती ज्या खोलीत ठेवण्यात आली होती त्या खोलीची निगराणी स्वतः भगवान बाबा आनंदगडकर हे करत होते.
advertisement
6 डिसेंबर रोजीचा तो दिवस मोठा कठीण होता. कारण परिस्थिती बिघडली असती तर आमचा तिथेच मृत्यू देखील होऊ शकला असता. परंतु राज्यात कल्याण सिंग तर केंद्रात नरसिंहरावांचे सरकार होतं. सुदैवानं अशी काही दुर्घटना घडली नाही. हे सर्व कार्य जरी आम्ही केलं असं वरवर वाटत असलं तरी कर्ता करविता हा प्रभू श्रीराम हेच होते. एक ना एक दिवस धर्मानुकूल सरकार येईल आणि भव्य श्रीराम मंदिर उभे राहील ही इच्छा आमच्या मनात जरूर होती. परंतु तो दिवस एवढ्या लवकर पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, असं भगवान बाबा आनंदगडकर यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/जालना/
तो दिवस मोठा कठीण होता, परिस्थिती बिघडली असती तिथेच…जालन्यातील कारसेवकांनी सांगितला तो थरारक अनुभव
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement