advertisement

खोबऱ्याच्या तुकड्यावरून 2 कुटुंबात तुफान राडा, कल्याणमध्ये महिलेला बेदम मारहाण

Last Updated:

कल्याणमधील पिसवली गावात एका किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

News18
News18
कल्याण: कल्याणमधील पिसवली गावात एका किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका खोबऱ्याच्या तुकड्यावरून दोन कुटुंब आपसात भिडले आहेत. एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील पिसवली गावातील एका चाळीमध्ये दोन कुटुंबे राहतात. चाळीतील एका कुटुंबाने रस्त्यावर खोबरे वाळत घातले होते. खेळता खेळता एका ८ वर्षाच्या मुलाने त्यातील एक खोबऱ्याचा तुकडा उचलला. या साध्या गोष्टीवरून शेजारील कुटुंबाने मोठा वाद घातला. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि आरोपींनी लहान मुलाच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली.
advertisement
व्हिडिओ व्हायरल आणि पोलीस कारवाई
या मारहाणीचा सर्व प्रकार एका स्थानिक व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. तो व्हिडिओ आता सर्वत्र पसरला आहे. या व्हिडिओमध्ये महिलेला कशा प्रकारे अमानुष मारहाण केली जात आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद केली आहे. किरकोळ कारणावरून एका महिलेला अशा प्रकारे मारहाण झाल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खोबऱ्याच्या तुकड्यावरून 2 कुटुंबात तुफान राडा, कल्याणमध्ये महिलेला बेदम मारहाण
Next Article
advertisement
PAK vs NZ :  पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर होण्यावर शिक्काच मारला
पाकिस्तानचा गेम ओव्हर, लाहोरच रिटर्न तिकीट कन्फर्म! पावसामुळे वर्ल्डकपमधून बाहेर
  • पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर होणार

  • न्यूझीलंड विरूद्ध सामना पावसामुळे रद्द

  • पावसाने पाकिस्तानचा गेम केला

View All
advertisement