Raj Thackeray : राज ठाकरे-अमित शाहांच्या बैठकीत काय झालं? बाळा नांदगावकरांनी सगळंच सांगितलं
- Published by:Shreyas
Last Updated:
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजप-मनसे यांच्यातल्या संभाव्य युतीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजप-मनसे यांच्यातल्या संभाव्य युतीचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जातंय. राज ठाकरे यांनी भाजपकडे लोकसभेच्या दोन जागा मागितल्या असल्याची माहिती समोर येत आहे, यातली एक जागा मुंबई दक्षिण आणि दुसरी नाशिकची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीहून परतल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेतली. बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच राज ठाकरे आणि भाजपमध्ये काय चर्चा झाली यावर माहिती दिली. 'आमच्यामध्ये काहीही चर्चा झालेली नाही, पण वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. मी दक्षिण मुंबईमधूनच दोन वेळा लोकसभा लढवली होती. आताही साहेब मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन लढवायचं आहे, तर मी गडचिरोलीला जाऊन उभा राहिन, कारण वर्षानुवर्ष आदेश ऐकण्याची सवय झाली आहे, त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि पुढची वाटचाल करतो', असं बाळा नांदगावकर म्हणाले.
advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी भेट झाली ह्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे उपस्थित होते. pic.twitter.com/qiZB9ITkH8
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 19, 2024
'दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं राज ठाकरेंनी आम्हाला सांगितलं, लवकरच निर्णय होईल. ज्या मागण्या केल्या आहेत, त्यावर फलदयी चर्चा झाली आहे. कुणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल. आता राज्य स्तरावर चर्चा होईल', अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
advertisement
दरम्यान 21 मार्चला राज ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे मनसेच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांच्या भेटीबाबत राज ठाकरे मनसेच्या नेत्यांना माहिती देणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 19, 2024 7:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray : राज ठाकरे-अमित शाहांच्या बैठकीत काय झालं? बाळा नांदगावकरांनी सगळंच सांगितलं