Solapur: सकाळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना दिला धक्का, संध्याकाळी त्याच नेत्याने दिला राजीनामा, सोलापुरात हायहोल्टेज ड्रामा
- Published by:Sachin S
Last Updated:
सोलापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालिका निवडणुकीसाठी एकीकडे उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे. तर दुसरीकडे
प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. पण उमेदवारीवरुन सगळ्याच पक्षांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. अशातच सोलापूरमध्ये एक राजकीय धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील आगामी महापालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. मुंबई आणि सोलापूरची जबाबदारी ज्या नेत्यावर दिली होती, त्यांनी तडाकफडकी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, सकाळीच फारूखी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना धक्का दिला होता.
advertisement
सोलापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पालिका निवडणुकीसाठी एकीकडे उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहे. तर दुसरीकडे एमआयएममध्ये नाराजीचा उद्रेक झाला आहे. एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष आणि मुंबई - सोलापूर अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. आगामी मुंबई आणि सोलापूर महापालिकेची एमआयएम पक्षाची पूर्ण जबाबदारी फारुख शाब्दी यांच्याकडे होती.
फारुख शाब्दी यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातून 2019 आणि 2024 ची एमआयएम कडून निवडणूक लढवली होती. त्यामुळे फारुख शाब्दी यांच्या राजीनामाच्या एमआयएम पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान शाब्दी यांनी हा तडकाफडकी राजीनामा का दिला याबाबत स्पष्टता दिलेली नाही.
advertisement
इम्तियाज जलील आणि फारूख याांच्यात मतभेद
पण, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोलापूरमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून एका नेत्यावर जबाबदारी दिली होती. तेंव्हापासून फारूख शाब्दी आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यानंतर आता फारूख यांनी राजीनामा दिल्यामुळे एमआयएमला धक्का बसला आहे.
सकाळीच शाब्दींनी काँग्रेसला दिला होता धक्का
view commentsदरम्यान, सोलापुरात राजकीय घडामोडी सुरूच आहे काँग्रेसने जाहीर केलेला उमेदवारांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्याचा समोर आलं आहे. लापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून फिरदोस पटेल यांना 16 प्रभागांमधून उमेदवारी जाहीर केली होती. फिरदोस पटेल यांनी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करूनही एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना हा धक्का मानला जात होता. सो एमआयएम पक्षाचे नेते फारूख शाब्दी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला होता. आता एमआयएम पक्षाकडून फिरदोस पटेल उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. पण, पटेल यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच फारूख शाब्दी यांनीच पक्षात काढता पाय घेतला.
Location :
Solapur [Sholapur],Solapur,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 5:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur: सकाळी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना दिला धक्का, संध्याकाळी त्याच नेत्याने दिला राजीनामा, सोलापुरात हायहोल्टेज ड्रामा









