Nagpur Crime : दो भाई दोनों तबाही! व्यसनाची भूक भागवण्यासाठी करायचे धक्कादायक कृत्य, घटनेचा उलगडा होताच पोलिसांना फुटला घाम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत व्यसनाची भूक भागण्यासाठी दोन सख्ख्या भावांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे.
Nagpur Crime News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत व्यसनाची भूक भागण्यासाठी दोन सख्ख्या भावांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना घडली आहे. ऋषभ पसोपा आणि ऋतिक पसोपा अशी या दोन भावांची नावे आहेत.या दोन भावांनी व्यसनासाठी चोरी केल्याची घटना उजेडात आली आहे. विशेष म्हणजे ही चोरी छोटी मोठी नव्हे तर तब्बल 50 लाखांची चोरी केली आहे.त्यामुळे या दोन भावांच्या कृत्याने पोलिसांना देखील घाम फुटला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांची एक टीम बाईक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होती.या दरम्यान पोलिसांच्या हाती अनेक सीसीटीव्ही फुटेज लागले होते. तसेच घटनास्थळावरून देखील पोलिसांनी अनेक फुटेज मिळाले होते.या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना शोधायचा प्रयत्न केला होता.यावेळी तब्बल पोलिसांनी 100 फुटेज तपासले होते. त्यानंतर त्याच्या हाती ऋषभ पसोपा आणि ऋतिक पसोपा असे दोन आरोपी भाऊ लागले होते.
advertisement
ऋषभ पसोपा आणि ऋतिक पसोपा हे दोन्हीही भाऊ बाईक चोरायचे आणि त्यानंतर वाठोडा परिसरातील दलाला विकून टाकायचे.यावेळी वाहनाची कंडीशन पाहून दर घ्यायचे. पोलिसांनी या दलालाचा शोध लावता असता त्याच्याकडे चोरीला गेलेली सर्व बाईक सापडले आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी या कारवाईत 50 वाहने असा जवळपास 50 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
advertisement
त्यानंतर चौकशीत जी गोष्ट समोर आली ती पाहून पोलिसांनाही हादरा बसला. दोन्ही आरोपींना ड्रगचे व्यसन होते.त्यामुळे दोघे प्रचंड व्यसन करायचे. पुढे जाऊन पैसे कमी पडायला लागल्यामुळे त्याने चोरी करायला सुरूवात केली होती. या दरम्यान त्यांनी तब्बल 50 वाहने चोरली होती, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. तसेच आता आरोपीनी या आधी कुठे चोरी केलीय का? किंवा पूर्वीचे गुन्हे दाखल आहे का? या घटनेचा तपास पोलिसांनी सूरू केला आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
September 20, 2025 10:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagpur Crime : दो भाई दोनों तबाही! व्यसनाची भूक भागवण्यासाठी करायचे धक्कादायक कृत्य, घटनेचा उलगडा होताच पोलिसांना फुटला घाम