Nandurbar Loksabha Result : नंदुरबारमध्ये भाजपला धक्का! हीना गावितांची हॅट्रिक चुकली, पाडवींचा विजय

Last Updated:

काँगेसच्या विजयानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या डॉ हिना गाविता यांचा पाडवी यांनी पराभव केला आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणूक निकाल
नंदुरबार लोकसभा निवडणूक निकाल
नंदुरबार : देशातील पहिला लोकसभा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारमध्ये भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गणला गेला. अशात या लोकसभा क्षेत्रात कोण विजय होईल याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आता याबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. इथे काँगेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत.
काँगेसच्या विजयानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या डॉ हिना गाविता यांचा पाडवी यांनी पराभव केला आहे. देशातील पहिला लोकसभा मतदारसंघ असलेल्या नंदुरबारमध्ये भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची सामना पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघ गणला गेला. अशात या लोकसभा क्षेत्रात कोण विजय होईल याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.
advertisement
या मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशा दोन उमेदवारांमध्ये सामना रंगला. शिवाय यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. याचा फायदा काँग्रेसला झाला असल्याचं आता समोर आलं आहे.
भाजपच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांना विजयाची हॅटट्रिक मारता आली नाही. कधीकाळी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गोवाल पाडवी यांनी बाजी मारली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडलं आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nandurbar Loksabha Result : नंदुरबारमध्ये भाजपला धक्का! हीना गावितांची हॅट्रिक चुकली, पाडवींचा विजय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement