Jalgaon Loksabha Result : जळगावच्या मतदारांची पुन्हा मोदींना साथ, स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने विजयी

Last Updated:

जळगाव लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत

स्मिता वाघ आणि करण पवार
स्मिता वाघ आणि करण पवार
जळगाव : जळगाव लोकसभा निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे जळगावमध्ये भाजपाने पुन्हा गड राखला आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना 4 लाख 83 हजार 748 मतं मिळाली आहेत. तर, महाविकास आघाडीच्या करण पवार यांना 2 लाख 95 हजार 782 मतं मिळाली.
जळगावमध्ये एकूण 11 लाख 65 हजार 968 मतदान झालं होतं. यातील 10 लाख 29 हजार 717 मतमोजणी झाली आहे. तर, 1 लाख 36 हजार 251 इतकी मतमोजणी बाकी आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्रही समोर आलं आहे. भाजपने आपला गड राखला आहे.
advertisement
खासदार उन्मेष पाटील यांचं बंड -
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करताच भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी बंड पुकारलं होतं. उन्मेष पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली होती. मात्र, तरीही भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Loksabha Result : जळगावच्या मतदारांची पुन्हा मोदींना साथ, स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने विजयी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement