नाशकात निवृत्त महिला अधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पोटच्या मुलानेच पाडलं रक्ताच्या थारोळ्यात
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशकात एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईवर चाकुने वार करून हत्या केली आहे. एकाच दिवसात शहरात अशाप्रकारे हत्येच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक: नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. आज पहाटे नाशिक शहरात एका तरुणाची देवदर्शनाला जाताना हत्या करण्यात आली होती. हत्येची ही घटना ताजी असताना अवघ्या पाच तासांत नाशकात हत्येची दुसरी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईवर चाकुने वार करून हत्या केली आहे. एकाच दिवसात शहरात अशाप्रकारे हत्येच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मंगला घोलप असं हत्या झालेल्या ४५ वर्षी महिलेचं नाव आहे. त्या सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. मंगला घोलप यांचा मुलगा स्वप्नील घोलप याने आपल्या आईवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तात्काळ आरोपी स्वप्नील घोलप यास ताब्यात घेतले आहे.
advertisement
आईच्या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सातपूर पोलीस सध्या गुन्हा नोंद करण्याचे काम करत असून, या घटनेमागील नेमके कारण आणि तपशीलवार तपास करत आहेत. अवघ्या काही तासांत दोन खुनामुळे नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
advertisement
विशेष म्हणजे गेल्या काळात नाशिक शहरासह आसपासच्या परिसरात हत्येच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागल्या नऊ महिन्यातील ही ४५ वी हत्या आहे. त्यामुळे शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आता पोलीस काय पावलं उचलणार ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 07, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशकात निवृत्त महिला अधिकाऱ्याची निर्घृण हत्या, पोटच्या मुलानेच पाडलं रक्ताच्या थारोळ्यात