Rudraksha Benefits: गळ्यात रुद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे, कोणी कोणता घालावा? परिधान करण्याचे नियम माहितीयेत का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:KUNAL SANTOSH DANDGAVAL
Last Updated:
Rudraksha Benefits in Marathi: उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे आणि विज्ञान देखील हे आरोग्याची रुद्राक्ष चांगले असल्याचे सांगितले जाते.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : आपल्याला सर्वांना माहिती रुद्राक्ष म्हणजे रुद्रांचा अर्थाच शंकरांचा अंश. रूद्राक्षाला हिंदू धर्मग्रंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेंदुचे विकार आणि अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे आणि विज्ञान देखील हे आरोग्याची रुद्राक्ष चांगले असल्याचे सांगितले जाते. रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत आणि ते मानवी शरीरावर कोणत्या स्वरूपात परिधान करावे? याबद्दच आपल्याला धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे यांनी दिली माहिती दिली आहे.
advertisement
रूद्राक्षाचे प्रकार कोणते?
दोन मुखी रुद्राक्ष, तीन मुखी रुद्राक्ष, चतुर्मुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, सहा मुखी रुद्राक्ष, सप्तमुखी रुद्राक्ष, अष्टमुखी रुद्राक्ष, नऊ मुखी रुद्राक्ष, दशमुखी रुद्राक्ष, एकादश मुखी रुद्राक्ष, द्वादश मुखी रुद्राक्ष, त्रयोदशमुखी रुद्राक्ष, चतुर्दशमुखी रुद्राक्ष हे रूद्राक्षाचे प्रकार आहेत.
रूद्राक्ष परिधान करण्याचे नियम
रुद्राक्षाची माळा किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपात धारण करून स्मशानभूमीत जाऊ नये. स्मशानभूमी अपवित्र जागा आहे. त्यामूळे तिथे दैवी शक्ती असलेला रूद्राक्ष नेऊ नये. एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये. रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील मणी विषम संख्येचे असावेत याची विशेष काळजी घ्या.
advertisement
लक्षात ठेवा की ही रुद्राक्ष माळ 27 मणांपेक्षा कमी नसावी. धाग्याव्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतो. रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यात धारण करू नये. त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे धाग्यामध्ये गुंफणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. त्याला अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये. सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्यन मंत्राचा नऊ वेळा जप करावा, असं धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे सांगतात.
advertisement
रूद्राक्ष धारण करताना काय करावे
रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा अवश्य जप करा. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतर धारण करावा.
राशीनूसार कोणता रूद्राक्ष घालावा
मेष, कर्क, तूळ, मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक सोयीस्कर ठरते. याशिवाय मेष राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, वृषभ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, मिथुन राशीच्या व्यक्तींनी चारमुखी, कर्क राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी, सिंह राशीच्या व्यक्तींनी एकमुखी, बारामुखी, कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रूद्राक्ष घालावा. तुळ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, धनु राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी, मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी, कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे, असं धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे सांगतात.
advertisement
खरा रूद्राक्ष कसा ओळखावा?
खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे, याची खात्री बाळगायला हरकत नाही. जे पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते. खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही, असंही धर्म अभ्यासक डॉ. नरेंद्र धरणे यांनी सांगितले.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Nov 18, 2024 10:48 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Rudraksha Benefits: गळ्यात रुद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे, कोणी कोणता घालावा? परिधान करण्याचे नियम माहितीयेत का?





