Satara: डॉक्टर महिलेला छळणारा PSI बदाने निघाला अट्टल रंगीला, महिलांसोबत करायचा घाणेरडं कृत्य, सगळी कुंडली समोर

Last Updated:

Satara Woman Doctor Death: फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यूस कारणीभूत असणारा आरोपी पीएसआय गोपाल भदाने याचे अनेक विकृत कांड समोर आले आहेत.

News18
News18
सातारा जिल्ह्याच्या फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला आहे. आपल्या मृत्यूस पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर नावाची व्यक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये केला आहे.
advertisement
पीएसआय बदाने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचं तिने हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटलं आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आरोपी गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर दोघंही फरार झाले. आज पहाटे सातारा ग्रामीण पोलिसांनी बनकरला पुण्यातील फार्महाऊसवर अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदाने याचे अनेक कांड समोर येत आहेत. त्याने केवळ महिला डॉक्टरच नव्हे तर इतर महिलांना देखील त्रास दिल्याचं समोर आलं आहे. तो अनेकदा महिलांचा छेड काढायचा, त्यांना डोळा मारायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महिलांचा छेड काढायचा, डोळा मारायचा

फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदाने याच्याविषयी अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत. काही महिलांनी थेट माध्यमांसमोर येऊन सांगितले की, बदने हा महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केली तर उलट पैसे मागायचा. एका महिलेनं आरोप केला की तिच्या भाचीने तक्रार द्यायला गेल्यावर बदनेने तिच्याच नवऱ्यासमोर तिला डोळा मारला आणि पाच हजार रुपये मागितले. पैसे दिले नाहीत म्हणून त्याने तक्रारीचं दार बंद केलं. या महिला साक्षींमुळे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत आहे. बदानेचा महिलांशी असलेला वर्तनाचा हा इतिहास आता उघडकीस येत असून, पोलिस विभागावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे."
advertisement

कुठे लपला होता प्रशांत बनकर?

मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यापासून प्रशांत बनकर फरार झाला होता. तो थेट पुण्यात आला. इथं तो एका मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता. मागील काही तासांपासून तो इथेच मुक्कामी होता. मात्र पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटे चार वाजता संबंधित फार्महाऊसवर छापेमारी केली. यावेळी तिथे प्रशांत बनकर पोलिसांना आढळला. सातारा ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली. याच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी काही धागेदोरे समोर येतायत का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara: डॉक्टर महिलेला छळणारा PSI बदाने निघाला अट्टल रंगीला, महिलांसोबत करायचा घाणेरडं कृत्य, सगळी कुंडली समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement