advertisement

नियतीही करू शकली नाही वेगळं, पतीच्या निधनानंतर पत्नीनंही सोडला श्वास, मन पिळवटून टाकणारी घटना!

Last Updated:

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. इथं पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच पत्नीने देखील अखेरचा श्वास घेतला आहे.

AI Generated Photo
AI Generated Photo
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. इथं पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासांतच पत्नीने देखील अखेरचा श्वास घेतला आहे. आयुष्यभर साथ निभावलेल्या पतीचं अचानक निधन झाल्याने विरह जिव्हारी लागून पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. अवघ्या काही तासातच दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना साकोली तालुक्यातील गिरोला इथं घडली.

परिस्थितीशी झुंज देत फुलवला संसार

गिरोला येथील सोविंदा गणपत बोरकर (८०) आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई (६५) यांनी अत्यंत कष्टातून संसार उभा केला होता. लग्नापासूनच गरिबीचे चटके सोसत, एकमेकांचा हात हातात घेऊन त्यांनी आयुष्यातील प्रत्येक संकटाचा सामना केला. उतारवयात मुलेबाळे असूनही हे दोघे वृद्ध एकमेकांसाठी सर्वात मोठा आधार होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होते.
advertisement

पतीच्या विरहाने खचल्या अंजनाबाई

१२ फेब्रुवारी रोजी सोविंदा बोरकर यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ज्या पतीसोबत आयुष्यभर सावलीसारखी सोबत केली, तो आधार अचानक हिरावला गेल्याने अंजनाबाई पार खचून गेल्या होत्या. पतीच्या निधनाचा धक्का त्यांच्यासाठी असह्य होता. घरात पतीच्या निधनामुळे सुतकाचे वातावरण होते आणि नातेवाईक सांत्वन करत होते.

अंत्यसंस्कारापूर्वीच पत्नीचा मृत्यू

१३ फेब्रुवारी रोजी सकाळी सोविंदा यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. संपूर्ण गाव त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी जमा झालं होतं. मात्र, पतीच्या विरहाचं दुःख अंजनाबाई पचवू शकल्या नाहीत. पतीचा देह समोर असतानाच त्यांची प्रकृती अचानक खालावली. काही कळायच्या आतच त्यांनीही या जगाचा निरोप घेतला.
advertisement

गावात हळहळ, सोबतच झाले अंत्यसंस्कार

एकाच घरातून पती-पत्नीची एकापाठोपाठ अंत्ययात्रा निघाल्याने गिरोला ग्रामस्थांचे डोळे पाणावले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ निभावणाऱ्या या दांपत्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करावा लागल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नियतीही करू शकली नाही वेगळं, पतीच्या निधनानंतर पत्नीनंही सोडला श्वास, मन पिळवटून टाकणारी घटना!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement