Sindhudurga PS Winning Candidate : सिंधुदुर्ग पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sindhudurga PS Winning Candidate : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाकडे आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून राजकीय वातावरणात उत्सुकतेची कमाल आहे.
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालाकडे आज संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून राजकीय वातावरणात उत्सुकतेची कमाल आहे. जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी पार पडलेल्या मतदानानंतर आता सत्तासमीकरण स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.
या निवडणुकीत एकूण ६१.९८ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक गावांमध्ये दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याचे चित्र दिसले. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता असून मतमोजणी केंद्रांवर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे.
आठ तालुक्यांत एकाचवेळी मतमोजणी
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये सकाळी १० वाजता एकाचवेळी मतमोजणी सुरू करण्यात आली. प्रत्येक गणासाठी १० ते १४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या कडक बंदोबस्तात टप्प्याटप्प्याने मतमोजणी पार पडत आहे. प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात असल्याची माहिती देण्यात आली.
advertisement
पंचायत समितीतील बिनविरोध निवडलेले उमेदवार
दरम्यान, विविध तालुक्यांतील काही गणांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.
कणकवली तालुका
१) वरवडे – सोनू सावंत (भाजप)
२) नांदगाव – हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली – महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी – संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक – दिव्या पेडणेकर (भाजप)
advertisement
६) नाटळ – सायली कृपाळ (भाजप)
देवगड तालुका
७) पडेल – अंकुश ठूकरूल (भाजप)
८) नाडण – गणेश राणे (भाजप)
९) बापर्डे – संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव – समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव – शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते – ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी
१३) कोकिसरे – साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले
१४) आसोली – संकेत धुरी (भाजप)
advertisement
१५) म्हापण – विष्णू फणसेकर (भाजप)
मालवण
१६) आडवली मालडी – सीमा परुळेकर (भाजप)
१७) आचरा – दिपक सुर्वे (भाजप)
सावंतवाडी
१८) शेर्ले – महेश धुरी (भाजप)
१९) विलवडे – प्रशांत सुकी (भाजप)
२०) माडखोल – प्रथमेश सावंत (अपक्ष)
२१) शिरवंडे – दीपक चव्हाण (शिवसेना)
२२) आंबोली – मायकल डिसोझा (शिवसेना)
दोडामार्ग
२३) कोलझर – गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
advertisement
२४) राजेश जाधव (भाजप)
२५) खारेपाटण, कणकवली – गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)
२६) देवगड मुणगे – सदाशिव ओगले (भाजप)
२७) देवगड तळवडे – सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)
(टीप - हाती येत असलेल्या निकालानुसार यादी अपडेट होत आहे...)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sindhudurga PS Winning Candidate : सिंधुदुर्ग पंचायत समिती विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी







