Solapur Loksabha : सोलापूरची लोकसभा प्रणिती शिंदेंना जड जाणार? भाजपकडून पद्मश्री विजेत्याला तिकीट?

Last Updated:

Solapur Loksabha : सोलापूर लोकसभेसाठी भाजपने नवीन चेहऱ्याला संधी देण्याची निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक काँग्रेसला जड जाणार असल्याचे दिसत आहे.

News18
News18
सोलापूर, (प्रीतम, पंडीत, प्रतिनिधी) : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने आता नवा डाव खेळला आहे. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडूनही नवा चेहरा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यात पद्मश्री मिलिंद कांबळे यांचं नाव चर्चेत आळं आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री, उद्योजक मिलिंद कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे सोलापूरची लढत आता चुरशीची होणार, हे निश्चित झालं आहे.
प्रणिती शिंदेंसमोर तुल्यबळ उमेदवार
मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज संघटनेचे सुमारे 10 हजार सभासद आहेत. भारतातील 21 राज्यात, विदेशात 7 शाखा कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित चेहरा भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे.
advertisement
कोण आहेत मिलींद कांबळे?
मिलींद कांबळे मूळचे नांदेडचे आहेत. सन 1983 ला विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात.
सन 1983 ते 1987 या कालावधीत काम करताना शहरमंत्री, शहरप्रमुख या प्रमुख जबाबदारी घेत शहरातील प्रमुख कार्यकर्ता होवून जिल्ह्यामध्येही काम करु लागले. मग जिल्ह्यामध्ये जबाबदारी घेत जिल्हाप्रमुख या नात्याने त्यांनी जिल्ह्यात प्रवास सुरू केला. त्यानंतर 1983 ते 1990 या कालावधीत पूर्णवेळ म्हणून बाहेर पडताना मुंबईमध्ये एका भागाचे संघटनमंत्री म्हणून जबाबदारी घेत यशस्वीपणे काम केले.
advertisement
परिषदेचे काम थांबवल्यानंतर उद्योग क्षेत्रात
देशभरात SC/ST प्रवर्गातील 10,000 गरजुना दलित इंडस्ट्रीयल चेंबर आफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज DICCI या संस्थेच्या वतीने यशस्वी उद्योजक बनवून त्यांच्या माध्यमातून औद्योगिक उत्पादन व सेवा उद्योगाचे देशभर नेटवर्क उभे केले. सध्या या DICCI या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
advertisement
मिलींद यांच्या या सर्व कामाची सरकारने दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर दलित उद्योजक तयार करण्यात फार मोठं यश मिळविलेले आहे. याच उल्लेखनीय कार्याची दखल घेवून केंद्र व राज्य सरकारनी त्याना खालील अवार्डनी सन्मानित केले...
2013 - पद्मश्री,
2015 - समाज भुषण, महाराष्ट्र राज्य.
2011 - उद्योग रत्न
advertisement
2010 - भीमरत्न
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Loksabha : सोलापूरची लोकसभा प्रणिती शिंदेंना जड जाणार? भाजपकडून पद्मश्री विजेत्याला तिकीट?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement