advertisement

Solapur: सुरक्षारक्षकानं 17 व्या मजल्यावरून खाली आणलं, पण ‘त्या’ कारणानं सगळं संपलं, धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

Sunil Sadarangani Case: सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती मिळताच त्याने प्रसंगावधान राखून 17 व्या मजल्यावर धाव घेतली. सदारंगानी यांना समजावत सुरक्षितपणे खाली आणले.

Solapur: सुरक्षारक्षकानं 17 व्या मजल्यावरून खाली आणलं, पण ‘त्या’ कारणानं सगळं संपलं, सोलापुरात काय घडलं?
Solapur: सुरक्षारक्षकानं 17 व्या मजल्यावरून खाली आणलं, पण ‘त्या’ कारणानं सगळं संपलं, सोलापुरात काय घडलं?
सोलापूर: प्रसिद्ध उद्योजक आणि मुलतानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांनी गुरुवारी टोकाचा निर्णय घेतला. विजयपूर रोडवरील सर्वात उंच असणाऱ्या पनाश अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी घेत जीवनयात्रा संपवली. अचानक घडलेल्या या घटनेने सोलापूरच्या उद्योग विश्वात खळबळ उडाली. विशेष म्हणजे या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओ पुढे आला असून यामध्ये ते हात जोडून प्रार्थना करताना आणि खाली झोपून स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत.
गुरुवारी दुपारी पनाशच्या 17 व्या मजल्यावर एक व्यक्ती हात जोडून उभा राहिल्याचे काही लोकांना दिसून आले होते. तेव्हा ही व्यक्ती सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक सदारंगानी असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र, उंच इमारतीच्या कोपऱ्यावर हालचाली दिसताच स्थानिकांनी सुरक्षा रक्षकाला माहिती दिली.
सुरक्षा रक्षकाने खाली आणलं पण..
सुरक्षा रक्षकाला याबाबत माहिती मिळताच त्याने प्रसंगावधान राखून 17 व्या मजल्यावर धाव घेतली. सदारंगानी यांना समजावत सुरक्षितपणे खाली आणले. परंतु, सदारंगानी यांनी “माझ्या गाडीची चावी वरच राहिली आहे, ती घेऊन येतो”, अशी बतावणी करून पुन्हा 17 वा मजला गाठला. तसेच सुरक्षारक्षकाला काही समजण्याच्या आतच थेट खाली उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली.
advertisement
दरम्यान, पनाश अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारल्याने सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांत कैद झाली. त्यानंतर याचे फुटेज देखील सोशल मीडिडायतून व्हायरल होत आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.
advertisement
गाडीच्या नंबर प्लेटवरून पटली ओळख
सुनील सदारंगानी हे दुपारच्या सायंकाळी चारचाकी वाहनाने घटनास्थळी आले होते. पनाश अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये गाडी लावून ते लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांवरूनच वरच्या मजल्यांवर गेले होते. सुरुवातीला त्यांना कुणीही ओळखले नव्हते. मात्र, नंतर गाडीच्या नंबरप्लेटवरून पोलिसांना त्यांची ओळख पटली.
कोण होते सुनील सदारंगानी?
सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 58) हे सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक आणि उद्योजक होते. सोलापुरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे राजकुमार राठी यांचे ते जावई होते. व्यवसाय आणि उद्योगामुळे त्यांचा सोलापुरातील नामवंत व्यक्तींशी दांडगा संपर्क होता. परंतु, गेल्या काही काळापूर्वी मुलतानी बेकरी बंद झाली होती. त्यानंतर ते पुण्यातील खराडी भागात स्थायिक झाले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच ते पत्नीसह सोलापुरात आले होते आणि त्यांचा पुन्हा सोलापुरातच स्थायिक होण्याचा मानस होता.
advertisement
दरम्यान, निकवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही काळापासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे त्यांना नैराश्याने ग्रासले होते. त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील सुरू होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur: सुरक्षारक्षकानं 17 व्या मजल्यावरून खाली आणलं, पण ‘त्या’ कारणानं सगळं संपलं, धक्कादायक माहिती समोर
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement