Water Supply: ऐन पावसाळ्यात डोंबिवलीत पाणीबाणी, या भागामध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
डोंबिवलीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात डोंबिवली शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
डोंबिवली: डोंबिवलीतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ऐन पावसाळ्यात डोंबिवली शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा काही वेळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथली महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा मीटर युनिट जोडणे तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 असा एकूण 5 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
advertisement
कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?
यामुळे डोंबिवलीतील पाथर्ली, ठाकुर्ली, चोळे, 90 फुटी रस्ता, भोईरवाडी, पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, गोग्रासवाडी, अयोध्यानगरी, फडके रस्ता परिसर, सुनीलनगर, आयरे रस्ता, राजाजी पथ, म्हात्रेनगर, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर, मोठागाव, ठाकुरवाडी, कोपर, शास्त्रीनगर, जयहिंद काॅलनी, सुभाष रस्ता, नवापाडा, कुंभारखाणपाडा, देवीचापाडा, उमेशनगर, चिंचोड्याचापाडा, गणेशनगर, रेल्वे वसाहत परिसर, भागशाळा मैदान परिसराला होणारा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करुन ठेवावा असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 12, 2025 6:20 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Water Supply: ऐन पावसाळ्यात डोंबिवलीत पाणीबाणी, या भागामध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, कारण काय?