advertisement

Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्सप्रेसला पुन्हा अपघात, रेल्वे ट्रकवर आलेल्या हरणाच्या कळपालाच...नेमकं काय घडलं?

Last Updated:

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मागचं अपघाताच शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. आता पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाल्याची घटना घडली आहे.


vande bharat express accident
vande bharat express accident
Vande Bharat Express Accident : बब्बू शेंख, मनमाड : देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस मागचं अपघाताच शुक्लकाष्ठ संपता संपत नाही आहे. आता पुन्हा एकदा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाल्याची घटना घडली आहे. मनमाडच्या वडगावं जवळ ही अपघाताची घटना घडली आहे.या अपघातात तीन हरणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा शोधात असताना रेल्वे ट्रॅकवर आल्यावर या हरणांना वंदे भारतची धडक बसल्याची माहिती आहे. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनेनंतर प्राणी प्रेमींमध्ये शोक व्यक्त होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडच्या वडगाव जवळ ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत हरणांचा छोटासा कळप हा पाण्याचा शोधात फिरत होता. पाणी शोधता शोधता या कळपातले काही हरणं ट्रॅकवर आले होते. या दरम्यान ट्रॅकवरून वेगाने धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने तीन हरणांना भीषण धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत हरणांचा अक्षरश चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हरणाचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच या अपघाताच्या घटनेने प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतं आहे.
advertisement
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाल्याची ही घटना काही नवीन नाही. याआधी देखील वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसने वलसाडजवळ एका गायीला धडक दिल्याने अपघात झाला होता. तसेच गांधीनगर मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसन ट्रेनला वटवाजवळ म्हशीचा कळप रूळावर आल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या काही घटनांमध्ये वंदे भारतचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या घटनांमुळे वंदे भारत मागचं अपघाताच शुक्लकाष्ठ कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vande Bharat Express Accident : वंदे भारत एक्सप्रेसला पुन्हा अपघात, रेल्वे ट्रकवर आलेल्या हरणाच्या कळपालाच...नेमकं काय घडलं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement