गुंड घायवळला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप, गृहराज्यमंत्री कदम यांनी हात वर केले, नियमानुसार...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Yogesh Kadam: आपल्यावर होत असलेल्या आरोपांचे अपेक्षेप्रमाणे गृहराज्यमंत्री कदम यांनी खंडन केले आहे.
पुणे : कोथरूडमध्ये आपल्या नावाची दहशत राहावी म्हणून गोळीबार करून पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लंडनवारीला गेलेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गुन्हेगारी कृत्यांची चर्चा होत असताना त्याच्या भावाच्या शस्त्र परवान्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचे न्यूज १८ लोकमतने समोर आणले आहे.
विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सचिन घायवळनं गृहखात्याकडं अपिल केलं होतं. त्या अपिलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला. दुसरीकडे आपल्यावर होत असलेल्या आरोपांचे अपेक्षेप्रमाणे गृहराज्यमंत्री कदम यांनी खंडन केले आहे.
advertisement
गृहराज्यमंत्री कदम यांनी हात वर केले
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. उपलब्ध कागदपत्रे आणि न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे, असे गृहराज्यमंत्री कदम म्हणाले.
advertisement
नीलेशनंतर सचिन घायवळ हाच टोळीचा म्होरक्या
निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न , आर्म्स ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी नाकारला असताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी अधिकृत शस्त्रपरवाना दिल्याच उघड झाले आहे. घायवळ टोळीचा निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गुंड घायवळला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप, गृहराज्यमंत्री कदम यांनी हात वर केले, नियमानुसार...