"आईला कडक शिक्षा द्या", सोलापुरात तरुण वकिलाने संपवलं जीवन, चिठ्ठीत जन्मदातीवर गंभीर आरोप

Last Updated:

Crime in Solapur: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका तरुण वकिलाने आपल्या बेडरूममध्ये आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका तरुण वकिलाने आपल्या बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून आपल्या जन्मदात्या आईवर खळबळजनक आरोप केले आहेत. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा द्या, असंही तरुणाने चिठ्ठीत लिहिलं आहे. जन्मदात्या आईच्या त्रासाला कंटाळून अशाप्रकारे तरुणाने आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुण वकिलाचं नाव आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीमध्ये सागरने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या आईला जबाबदार धरले आहे.
सागरने आपल्या वेदना व्यक्त करताना चिठ्ठीत म्हटले आहे की, "आईकडून होणारा सततचा होणारा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती."
advertisement
सागर मंद्रूपकर यांचे वडील सरकारी नोकरदार असून, त्याची बहीण विवाहित आहे. प्राप्त माहितीनुसार, सागर आणि त्यांच्या आईचे मंगळवारी रात्री कडाक्याचे भांडण झालं होतं. या भांडणानंतर सागरने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची नोंद सोलापुरातील सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
advertisement
सध्या विजापूर नाका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुण वकिलाने आईवर गंभीर आरोप करत आत्महत्या केल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली असून चिठ्ठीतील आरोपांच्या आधारे विजापूर नाका पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
"आईला कडक शिक्षा द्या", सोलापुरात तरुण वकिलाने संपवलं जीवन, चिठ्ठीत जन्मदातीवर गंभीर आरोप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement