SBI YONO यूझर्स लक्ष द्या! आधार अपडेट न केल्यास अॅप ब्लॉक होणार? पाहा सत्य
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
SBI YONO App Block Scam: एसबीआय बँकेत अकाउंट असणाऱ्या आणि योनो अॅपचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसबीआय योनो अॅप ब्लॉक केलं जाणार या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. चला पाहूया...
PIB Warning SBI Scam Message: बँकांमध्ये जाऊन पैसे काढण्याचा, पैसे भरण्याचा किंवा बँकेत जाऊन गुंतवणूक करण्याचा काळ आता गेलाय. सध्या डिजिटल युग सुरूये. या डिजिटल युगात बँकींग सुविधा वाढल्या आहेत. पण असं असताना सायबर फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत. हे लोक नवनवीन पद्धती शोधून ग्राहकांना फसवणतात. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर एस मेसेज वेगाने व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांना घाबरवण्याचं काम केलं जातंय. मेसेजमध्ये दावा केलाय की, तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नाही तर तुमचा ‘SBI YONO’ अॅप ब्लॉक केला जाईल. सरकारच्या अधिकृत फॅक्ट-चेक एजेंसी पीआयबी फॅक्ट चेकने हा दाव्याची पडताळणी केली. ज्यानंतर यामागचं सत्य समोर आलंय.
संपूर्ण प्रकरण काय?
या व्हायरल मेसेजमध्ये ग्राहकांना 'APK' फाइल डाउनलोड करण्याची लिंक पाठवली जातेय. मेसेजमध्ये लिहिलेय की, 'आधार अपडेट करण्यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. ही फाइल इंस्टॉल करणं महत्त्वाचं आहे. अन्यथा बँकिंग सेवांवर परिणाम होईल.'
PIB Fact Check आणि SBI चा इशारा
पीआयबी फॅक्च चेकने ट्विट करुन स्पष्ट केलंय की, एसबीआय कधीच आपल्या ग्राहकांना असे मेसेज पाठवत नाही. बँकेने स्पष्ट केलंय की, आधार अपडेट करण्यासाठी ते कधीच थर्ड-पार्टी लिंक किंवा APK फाइल डाउनलोड करण्यास सांगत नाही.
advertisement
एसबीआयच्या अधिकृत हँडलनेही यावर प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले की, 'क्लिक करण्यापूर्वी विचार करा' फसवणूक करणारे तुमच्या बँकिंग अॅपला अपडेट करण्याचा दावा करतात आणि APK लिंक पाठवतात. हे तुमचे पैसे उकळण्याचा डाव असू शकतो. यावर क्लिक करुन नका. तसंच ती फाइल डाउनलोडही करू नका.
Is it true that your SBI YONO app will be blocked if you don’t update your Aadhaar❓
A message circulating on social media in the name of SBI claims that users must download and install an APK file to update their Aadhaar. It further claims that if Aadhaar is not updated, the… pic.twitter.com/KIWuMiLfCe
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 22, 2026
advertisement
APK फाइल एवढी घातक कशी?
सायबर एक्सपर्ट सांगतात की, APK फाइल या अँड्रॉइड अॅपच्या इंस्टॉलेशन फाइल्स असतात. तुम्ही प्ले स्टोरच्या बाहेर एखादी अनोळखी लिंकने अशी फाइल डाउनलोड करता, तेव्हा तुमच्या फोनमध्ये 'मालवेयर' किंवा 'स्पायवेयर' घुसू शकतात. हे सॉफ्टवेयर तुमच्या फोनचा पूर्ण कंट्रोल हॅकर्सला देऊ शकतात. ज्यामुळे तुमचे ओटीपी, पासवर्ड आणि पर्सनल डेटाला वाचू शकता. ज्यामुळे क्षणार्धात तुमचं अकाउंट रिकामं होऊ शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 23, 2026 11:21 AM IST





