Bigg Boss Marathi नंतर The 50 जिंकला शिव ठाकरे, ट्रॉफी मिळाली पण 50 लाखांचं कॅश प्राइझ कुणी भलताच घेऊन गेला
- Published by:Priya Lad
Last Updated:
The 50 Winner Shiv Thakare : द 50 या रिएलिटी शोच्या विजेत्यासाठी ट्रॉफी आणि 50 लाखांचं कॅश प्राइझ होतं. शिव ठाकरे विजेता होताच त्याला ट्रॉफी मिळाली पण कॅश प्राइझ नाही, असं का?
advertisement
advertisement
advertisement
'द 50' चा विजेता म्हणून नाव घोषित होताच आणि हातात ट्रॉफी येताच शिव भावुक झाला. त्याने आपल्याला सर्वात आधी घरी जाऊन आपल्या आईला भेटायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, त्याला स्वतःच्या हाताने ट्रॉफी तिच्या हवाली करायची होती, कारण संपूर्ण शोमध्ये ती त्याच्या विजयासाठी प्रार्थना करत होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
शोच्या नियमानुसार विजेत्याचं कॅश प्राइझ त्याच्या रजिस्टर चाहत्यांपैकी एका लकी चाहत्याला मिळणार होतं आणि ते शिवच्या सीताराम आघाव नावाच्या फॅनला मिळालं आहे. शिवचा फॅन सीतारामला हा कॅश प्राइझचा चेक शो दरम्यान देण्यात आला. शिवने स्वतः हा निर्णय जाहीर केला आणि सीतारामने त्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्याचे आभार मानत चेक त्याला दिला.
advertisement
शिवने आपला विजय प्रिन्स नरुलालाही समर्पित केला, ज्याने त्याला शेवटच्या फेरीपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली. उपांत्य फेरीच्या टास्क दरम्यान अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी स्पर्धकांना संकेत आणि झेंड्यांशी संबंधित एक शारीरिक आव्हान पूर्ण करायचं होतं. प्रिन्सने सर्वात वेगाने टास्क पूर्ण करून तिकीट मिळवलं. पण त्याने आपलं स्थान शिवला देण्याचे ठरवलं, कारण त्याने आधीच अनेक रिॲलिटी शो जिंकले होते आणि तरुण स्पर्धकांना संधी मिळावी अशी त्याची इच्छा होती.





