advertisement

Overdraft Facility : खात्यात पैसे नसले तरी 10 हजार काढता येतात; संकटकाळात होईल मदत; कुणाला मिळतो लाभ?

Last Updated:

Overdraft Facility : बचत आणि चालू खात्यांवर जवळपास प्रत्येक बँकेकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते.

खात्यात पैसे नसले तरी 10 हजार काढता येतात
खात्यात पैसे नसले तरी 10 हजार काढता येतात
मुंबई : पूर्वी मोबाईलचा रिचार्ज संपला तर लोन बॅलन्स घेण्याची सुविधा मिळत होती. आता अशीच सुविधा बँक खात्यात पैसे नसताना मिळणार आहे. जर तुम्ही नवीन बँक खाते उघडणार असाल तर तुम्हाला त्यावर ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळत आहे का? हे विचारुन घ्या. तुमचं आधीच खातं असेल तरीही तुमच्या बँकेत या सुविधेची चौकशी करा. ओव्हरड्राफ्ट किंवा ओडी सुविधा तुम्हाला अडचणीच्या वेळी देवदूतापेक्षा कमी नाही. जन धन खाते असलेल्या लोकांना ही सुविधा मिळते. आज आम्ही तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा काय असते? आणि ती कशी मिळवायची याबद्दल सांगणार आहोत.
ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचं कर्ज आहे, जे बँक तुम्हाला देते. त्याची खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरण्याची किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही. तुम्हाला त्वरित OD सुविधा मिळते. तुम्ही कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता. मात्र, तुम्हाला किती पैसे मिळतील हे आधीच ठरवले जाते.
OD चा नियम काय आहे?
प्रत्येक बँक OD ची रक्कम वेगळ्या पद्धतीने ठरवू शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचे जन धन खाते असेल तर त्याला OD अंतर्गत 10,000 रुपये मिळू शकतात. ती व्यक्ती थेट एटीएममधून हे पैसे काढू शकते. ओव्हरड्राफ्ट अंतर्गत पैसे काढण्यासाठी तुमच्या खात्यात पैसे ठेवण्याची गरज नाही. जन धन खाते असलेल्या व्यक्तीच्या खात्यात शून्य शिल्लक असले तरी तो 10,000 रुपये काढू शकतो. त्यानंतर ही रक्कम त्याला व्याजासह परत करावी लागते. ओडी अंतर्गत केवळ 10,000 रुपये मिळतात असं नाही. अनेक बँका या रकमेपेक्षा जास्त रक्कम ओडीमध्ये देतात. पण तुम्हाला त्या खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याचीही काळजी घ्यावी लागेल.
advertisement
व्याज किती असेल?
जन धन खात्यावर मिळालेल्या ओडीवरील व्याज 2 ते 12 टक्क्यांपर्यंत असू शकते. हे वेगवेगळ्या बँकांवर अवलंबून आहे. परंतु व्याज 12 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. जर बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा 50,000 रुपये असेल आणि ग्राहकाने त्यातून 10,000 रुपये काढले असतील, तर 50,000 रुपयांवर नव्हे तर फक्त 10,000 रुपयांवर व्याज आकारले जाईल. केवळ आपत्कालीन परिस्थितीत ओव्हरड्राफ्ट वापरण्याचा सल्ला दिला जातो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Overdraft Facility : खात्यात पैसे नसले तरी 10 हजार काढता येतात; संकटकाळात होईल मदत; कुणाला मिळतो लाभ?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement