advertisement

Bank Rules : बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही किती पैसे जमा करु शकता? व्याजावर किती टॅक्स द्यावा लागतो?

Last Updated:

Saving account rules: तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवल्या कॅशवरही इन्कम टॅक्स विभागाची नजर असते. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅशची माहिती बँकांना आयकर विभागाला द्यावी लागते.

सेव्हिंग अकाउंट
सेव्हिंग अकाउंट
नवी दिल्ली : आज देशभरात प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट आहे. बँक अकाउंट अनेक प्रकारचे असतात. त्यामधून एक सेव्हिंग अकाउंट आहे. हे असं अकाउंट आहे जे सर्वात जास्त ओपन केलं जातं. सेव्हिंग अकाउंटमध्ये लोक सामान्यतः आपली बचतीचा पैसा ठेवतात. तुम्ही हवे तेवढे सेव्हिंग अकाउंट ओपन करु शकता. एवढंच नाही तर सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची कोणतीही मर्यादा नसते. म्हणजेच तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये हवा तेवढा पैसा जमा करु शकता. बचत खात्यामध्ये पैसा जमा केल्यावर आयर कायदा किंवा बँकिंग रेग्युलेशन्समध्ये कोणतीही मर्यादा नसते.
मात्र, असा नियम आहे की, तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश एका आर्थिक वर्षात जमा केली तर याची माहिती बँक आयकर विभागाला अवश्य देते. आयकर अधिनियम 1961 च्या कमल 285बी एनुसार, बँकांसाठी ही माहिती देणं अनिवार्य करण्यात आलंय. सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेल्या कॅशचा आयटीआरमध्ये दिलेल्या माहितीशी सुसंगत नसली तर आयर विभाग तुम्हाला नोटीस जारी करु शकते.
advertisement
व्याजावर द्यावं लागतं टॅक्स
आयटीआर फाईल करताना आयकरदात्याला आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा पैशांची माहिती द्यायला हवी. तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये डिपॉझिटमधून जे व्याज मिळतं ते तुमच्या इन्कमशी जोडलं जातं. तसंच व्याजावर इन्कम टॅक्स लावलं जातं. बँक 10 टक्के टीडीएस व्याज कटतं. सेव्हिंग अकाउंटवरुन मिळालेल्या व्याजावरही टॅक्स कपातीचा लाभ दिला जाऊ शकतो. आयकर अधिनियमच्या कलम 80 टीटीएनुसार सर्व व्यक्ती 10 हजारांपर्यंतची सूट मिळवू शकता.
advertisement
एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, सेव्हिंग अकाउंटमधून मिळविलेले व्याज समाविष्ट करूनही, कर दायित्व होण्यासाठी पुरेसे नसेल, तर तो फॉर्म 15G सबमिट करून बँकेने कट केलेल्या टीडीएसचा रिफंड मिळवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Bank Rules : बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही किती पैसे जमा करु शकता? व्याजावर किती टॅक्स द्यावा लागतो?
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement