advertisement

Bank Statement : एका वर्षात कितीवेळा बँक स्टेटमेंट चेक करु शकता?

Last Updated:

नियमित स्टेटमेंट तपासण्याचेही फायदे आहेत. चला तर, वर्षातून किती वेळा हे स्टेटमेंट तपासणं गरजेचं आहे, ते जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : बँक स्टेटमेंट म्हणजे तुमच्या बँक अकाउंटसंबंधी ठराविक कालावधीत झालेल्या व्यवहारांची नोंद असते. यामध्ये तुम्ही संबंधित अकाउंट वापरून केलेल्या व्यवहारांचं थोडक्यात वर्णन असतं. बँक स्टेटमेंटमध्ये ठेवी, चार्जेस, पैसे काढणं आणि एखाद्या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये सुरुवातीला किती पैसे होते, व कालावधी संपल्यानंतर किती शिल्लक होती, याची माहिती असते. तुमच्या बँक अकाउंटच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवहाराचा तपशील ठेवणाऱ्या या फीचरचा वापर न करण्याचे तोटेही आहेत. त्याचबरोबर नियमित स्टेटमेंट तपासण्याचेही फायदे आहेत. चला तर, वर्षातून किती वेळा हे स्टेटमेंट तपासणं गरजेचं आहे, ते जाणून घेऊ.
एका वर्षातून किती वेळा बँक स्टेटमेंट तपासावं? या प्रश्नाचं उत्तर बहुतांश बँक ग्राहकांना माहिती नसतं. हे स्टेटमेंट ग्राहक फक्त तेव्हाच तपासतात, जेव्हा त्यांना ते कुठेतरी द्यावं लागतं. पण, ही सवय अजिबात चांगली नाही. खरं तर तुम्ही तुमचं बँक स्टेटमेंट दर महिन्याला म्हणजेच वर्षातून किमान 12 वेळा तपासलं पाहिजं. ते तुमच्यासाठी फायदेशीर कसं ठरू शकतं, या बाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
advertisement
बँक चार्जेसची माहिती
विविध व्यवहारांवर बँका काही विशिष्ट रक्कम चार्जेस आकारतात. पण अनेकदा तुम्हाला त्याची माहितीही नसते. उदाहरणार्थ, काही बँका प्रत्यक्ष अकाउंट तपशील, डुप्लिकेट पासबुक देणं, डेबिट कार्ड फी इत्यादींवर काही चार्जेस आकारतात. बँकेनं कोणतेही कारण न देता जर तुमच्या अकाउंटमधून चार्जेस कापले असतील, तर त्याची माहिती तुम्हाला बँक स्टेटमेंटमध्ये मिळते. त्यानंतर तुम्ही याबाबत बँकेत तक्रार करू शकता.
advertisement
फसवणुकीची माहिती मिळते
बँक व्यवहारासंबंधी फसवणूक ही आजकाल सामान्य बाब झालीय. खरं तर आता बँका प्रत्येक व्यवहाराची माहिती एसएमएसद्वारे देतात. पण काही वेळा एसएमएस मिळत नाही. अशावेळी तुमची बँकिंग व्यवहारासंबंधी फसवणूक झाली असेल, तर ते बँक स्टेटमेंटवरून कळेल. हे एक असं महत्त्वाचं कागदपत्र आहे, जे तुम्ही फसवणुकीचा पुरावा म्हणून वापरू शकता.
advertisement
गुंतवणुकीसाठी मदत
दर महिन्याला स्टेटमेंट तपासल्याने तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे शिल्लक आहेत, ही माहिती मिळते. अशावेळी तुम्ही ही शिल्लक रक्कम योग्य ठिकाणी गुंतवून जास्त रिटर्न मिळवू शकता.
खर्चावर लक्ष
बँक स्टेटमेंटमुळे तुम्हाला संबंधित अकाउंट वापरून केलेल्या व्यवहारांची माहिती मिळवण्यास मदत होते. तुम्ही जर रेस्टॉरंटचं बिल, ऑनलाईन शॉपिंग अशा विविध बाबींवर विनाकारण जास्त पैसे खर्च करत असाल, तर ते सहज कळते. त्यामुळे तुम्ही तुमचे खर्च देखील कमी करू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Bank Statement : एका वर्षात कितीवेळा बँक स्टेटमेंट चेक करु शकता?
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement